अमेरिकमध्ये सध्या 78 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडतोय. मनोरंजन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी जगभरातील कलाकरांना या सोहळ्यात सन्मानित केलं जातं. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. मात्र यंदा करोना व्हायरसच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम या सोहळ्यावरही झाल्याचं दिसतंय.

यंदाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा व्हर्च्युअल स्वरुपात पार पडतोय. अनेक बड्या सेलिब्रिटींनी आपल्या घरातून  कुटुंबासोबत व्हर्च्युअली  या सोहळ्याला उपस्थिती दिलीय. 3 फ्रेब्रुवारीला पुरस्कारांच्या नामांकनाची यादी जाहीर करण्यात आली होती. लॉस एंजलिस आणि न्यूयॉर्कमधून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय.

तर या वर्षीच्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘बोराट सब्सिक्वेंट मुव्ही फिल्म’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.

यंदा कुणी कोरलं गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर नाव?

  • बेस्ट मोशन पिक्चर (ड्रामा)

नोमॅडलँड (हायवेमॅन, सर्चलाइट पिक्चर)

या सिनेमाला मिळालेला हा यंदाचा दुसरा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कारदेखील याच सिनेमाला मिळाला आहे.

  • बेस्ट परफॉर्मन्स ( अभिनेत्री- ड्रामा)
    अँड्रा डे
    अँड्रा डे या अभिनेत्रीने बेस्ट मोशन पिक्चर या श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवलाय. युनायटेड स्टेट्स वर्सेस बिली हॉलिडे या सिनेमातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार प्राप्त झालाय.

बेस्ट परफॉर्मन्स ( अभिनेता- कॉमेडी)
साचा बेरॉन कोहेन
विनोदी सिनेमाच्या श्रेणीत पुन्हा एकदा ‘बोराट सब्सिक्वेंट मुव्ही फिल्म’ या सिनेमाने बाजी मारलीय. या सिनेमातील अभिनयासाठी साचा बेरॉन कोहेनला बेस्ट परफॉर्मन्साठी पुरस्कृत करण्यात आलंय.

  • बेस्ट परफॉर्मन्स (अभिनेत्री- कॉमेडी)
    रोझमंड पाईक –
    ‘केअर अ लॉट’ या सिनेमासाठी रोझमंडला सन्मानित करण्यात आलंय.

अमेरिकेमधून गोल्डन ग्लोब पुरस्कार जाहीर केले जात आहेत. विविध देशातून अनेक सेलिब्रिटी व्हर्चुअली या सोहळ्याला जोडले गेले आहेत.