News Flash

खुशखबर! इरफान खान सात महिन्यांच्या उपचारानंतर लवकरच भारतात परतणार

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरवरील उपचारासाठी तो गेल्या सात महिन्यांपासून लंडनमध्ये आहे. येत्या एक- दोन दिवसांत तो मुंबईत परतणार आहे.

irrfan khan
इरफान खान, irrfan khan

अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास सात महिन्यांच्या उपचारानंतर इरफान लवकरच भारतात परतणार आहे. इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour हा दुर्धर आजार झाल्याचं निदान झालं होतं. त्याच्या उपचारासाठी तो गेल्या सात महिन्यांपासून लंडनमध्ये होता.

गेल्या कित्येक दिवसांपासून इरफान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या प्रकृतीविषयी अनेकांनीच चिंता व्यक्त केली आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. इरफानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे तो लवकरच ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. येत्या एक- दोन दिवसांत तो मुंबईत परतणार असून त्यानंतर लगेच शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे इरफानच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं स्पष्ट होतं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘हिंदी मिडियम’चे निर्माते इरफानला भेटण्यासाठी लंडनला गेले होते. त्यांनी इरफानला चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यानंतर त्याने सिक्वलमध्ये काम करण्यासाठी होकार कळवला. २०१७ साली प्रदर्शित झालेला इरफानचा ‘हिंदी मिडियम’ बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर इरफानसोबत झळकली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा होती पण इरफानच्या प्रकृतीमुळे सिक्वलमध्ये दुसऱ्या अभिनेत्यासाठी विचार केला जाणार होता. या सिक्वलचं दिग्दर्शन होमी अदजानिया करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 12:05 pm

Web Title: good news for fans irrfan khan to return to mumbai soon start shooting for hindi medium sequel
Next Stories
1 दीपिका- रणबीर कपूर पुन्हा येणार एकत्र?
2 #MeToo : माझ्यावरही झाला होता बलात्काराचा प्रयत्न, आलियाच्या आईचा खळबळजनक खुलासा
3 प्रियांकासाठी निकनं खरेदी केलं तब्बल ४७ कोटींचं घर
Just Now!
X