News Flash

पुन्हा एकदा एकत्र झळकणार प्रार्थना- अनिकेतची जोडी

या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा रंगविण्यात आली आहे.

पुन्हा एकदा एकत्र झळकणार प्रार्थना- अनिकेतची जोडी

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव या दोघांकडे कायमच एव्हरग्रीन कलाकार म्हणून पाहिलं जातं. मस्का या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करणारी ही जोडी लवकरच ‘अबलख’ या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपटामध्ये त्यांची केमिस्ट्री कशी असेल याकडे साऱ्यांच लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतं.

आनंद शिवाजी चव्हाण दिग्दर्शित ‘अबलख’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटामध्ये प्रार्थना आणि अनिकेतची जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा रंगविण्यात आली आहे.

दरम्यान, ‘मस्का’ चित्रपटानंतर अनिकेत आणि प्रार्थनाचा हा दुसरा चित्रपट आहे. आयुष्य हा एक प्रवास असून या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असेही या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ऑक्टोबरपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असून हा चित्रपटाची निर्मिती श्री तुळजाभवानी प्रसन्न फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 1:12 pm

Web Title: good news prarthana and aniket new marathi film
Next Stories
1 ”मित्रों’चा मोदींशी काहीच संबंध नाही’
2 #ThugsOfHindostan : आमिर पुकारणार एक नवीन युद्ध; ‘बाहुबली २’ला देणार का टक्कर?
3 छोट्या पडद्यावर ‘धडक’णार जान्हवी- इशान
Just Now!
X