News Flash

पहिल्यांदाच एकत्र झळणार सुमित -मृणालची जोडी

'होम स्वीट होम'च्या निमित्ताने त्यांना एकत्र झळकण्याची संधी मिळाली आहे.

'होम स्वीट होम'मध्ये पहिल्यांदाच एकत्र झळकण्यास सुमित-मृणाल सज्ज

फ्रेम्स प्रोडक्शन आणि प्रोअॅक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मान्यवर कलाकारांची मांदियाळी पाहता येणार असून पहिल्यांदाच सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुमित आणि मृणालने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. या दोघांनीही अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं असून पहिल्यांदाच ‘होम स्वीट होम’च्या निमित्ताने त्यांना एकत्र झळकण्याची संधी मिळाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत मृणाल कुलकर्णी यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे, छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तर हिंदी आणि मराठी रंगभूमीवर सुमित राघवन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन मोठे कलाकार एकत्र आल्याने त्यांची केमिस्ट्री बघणे प्रेक्षकांसाठी निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, मोहन जोशी आणि सुमित राघवन सुद्धा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत, ऐंशीच्या दशकात एका मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. घर आणि घरातील माणसांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ चित्रपट घराविषयीच्या अनेक रंजक कल्पना आणि भावनाप्रधान घटनांचा साक्षीदार आहे.

या चित्रपटामध्ये सुमित, मृणालसह, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, क्षिती जोग, प्रसाद ओक आदी कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 12:21 pm

Web Title: good news sumit and mrunal new marathi film
Next Stories
1 अनुप जलोटा यांच्याशी असलेल्या नात्याविषयी जस्लीनचे वडील म्हणतात…
2 Ganesh Utsav 2018 : पाहा, गणरायासाठी प्रिया बापटची स्वरसाधना
3 अमेयनं दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का?
Just Now!
X