News Flash

मराठी चित्रपट रसिकांना भागिदारीत चित्रपट निर्मितीची संधी

ठराविक रक्कम भरून या संस्थेद्वारे निर्माण होणाऱ्या चित्रपटाचे निर्माते, सहनिर्माते होता येणार आहे.

मराठी चित्रपट निर्मितीची सुप्त इच्छा बाळगणाऱ्यांसाठी ‘गुडलक एंटरटेन्मेन्ट क्रिएटर्स’च्या सहकार्याने मराठी चित्रपट सृष्टीतले जाणकार अनुभवी विश्वसनीय अशा टिमसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अपुऱ्या बजेट अभावी आपले चित्रपट निर्मितीचे स्वप्न स्वप्नच न राहता प्रत्यक्षात साकारण्यासाठी भागीदारी तत्वावर ठराविक रक्कम भरून या संस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या चित्रपट निर्मितीचे निर्माते, सहनिर्माते होता येणार आहे.

कसदार विषय घेऊन दर्जेदार चित्रपट निर्मिती, सोबत कुशल मार्केटिंग व्यवस्थापन, प्रसिद्धी आणि वितरण अश्या चौफेर अंगाने चित्रपट निर्मिती करण्यासाठी ‘गुडलक एन्टरटेन्टमेन्ट क्रिएटर्स’ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आपल्यासोबत सहकारी तत्वावर भागीदारीत चित्रपट निर्मितीसाठी चित्रपट उद्योजक – व्यावसायिक रसिकांनी यावे असे आवाहन संस्थेने केले आहे. ठराविक रक्कम भरून या संस्थेद्वारे निर्माण होणाऱ्या चित्रपटाचे निर्माते, सहनिर्माते होता येणार आहे. सध्या मराठी चित्रपट व्यवसाय तेजीत असून, जगभरात चित्रपट व्यवसाय करण्याच्या विविध संधी व पर्याय उपलब्ध झाल्याने चित्रपट निर्मितीतून नफा कमविण्याचे नवनवे मार्गही उपलब्ध होत आहेत. कलात्मक आणि व्यावसायिक निर्मितीचं काटेकोर नियोजन करण्यासाठी ही संस्था चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या अनुभवाचा योग्य आणि पुरेपूर उपयोग करून घेणार आहे. भागीदारी तत्त्वावर अधिकाधिक नवीन, अनुभवी निर्माते, रसिक, जाणकारांनी एकत्रितपणे चित्रपट निर्मितीसाठी सोबत आल्याने या व्यवसायाची व्याप्ती अधिक वाढविणे सुलभ होणार आहे.

नवनव्या विलक्षण कथा कल्पना निवडून चित्रपटांची निर्मिती करण्यासोबतच आपला चित्रपट महाराष्ट्रासह जगभरात विविध ठिकाणी कसा पोहचवता येईल? व्यावसायिक सादरीकरण कसे होईल? यावर संस्थेचा भर असणार आहे. अनुभवी कलावंत तंत्रज्ञांच्या सहाय्याने हे धोरण राबविले जाणार असून आपल्या चित्रपटांच्या निर्मितीतून १००% लाभ गुंतवणूकदारांना कसा देता येईल याचा प्राधान्याने विचार संस्थेतर्फे केला जाणार आहे. अपुरे बजेट असणाऱ्या निर्मात्याना त्यांचे निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संस्था मदत करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 6:44 pm

Web Title: goodluck entertainment creators helping producers to produce marathi cinemas
Next Stories
1 रॅप म्हणत कियाराने कापले केस, पाहा व्हिडिओ
2 #MeToo वरील आरोपांवर बोलताना अली जफरला कोसळलं रडू
3 सलमान-फरहान करणार एकत्र काम?
Just Now!
X