Google Doodle Lachhu Maharaj: बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं डुडुलद्वारे त्यांना मानवंदना वाहिली आहे. १६ ऑक्टोबर १९४४ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव लक्ष्मीनारायण सिंह होय. तालाच्या अगाध दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली साधना ही खूपच मोठी होती. पण त्यांच बरोबरीनं लच्छू महाराजांच्या अंगी असलेली सर्जनशीलता कुणालाही हेवा वाटावी अशीच होती. म्हणूनच गुगलनं मानवंदना वाहून या महान कलाकाराचं स्मरणं केलं आहे.

आपले वडील वासुदेव नारायण सिंह यांच्याकडून त्यांनी तालाची तालीम घेतली. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी तबलावादन करायला सुरूवात केली. संगीताच्या क्षेत्रात बनारस या शहराचे योगदान अनन्यसाधारण म्हणावे असे. लच्छू महाराज यांनी या शहरात नाव मिळवले. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती चित्रपट संगीताच्या क्षेत्रात. त्यांनी अनेक गीतांसाठी तबलावादन केले. आणिबाणीच्या काळात सराकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी तुरूंगात तबलावादन केलं. पद्मश्री पुरस्कार त्यांनी प्रांजळपणे नाकाराला. श्रोत्यांकडून मिळालेली प्रशंसा हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे असं ते मानत.