लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या ‘पिप्सी’ या चित्रपटातील गूज हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झालेल्या या गाण्यातून समाजातील दाहकता आणि वास्तविकतेचं वर्णन करण्यात येत आहे. तसंच समाजातील या बदलाकडे चिमुरड्यांचा पाहण्याचा नवा दृष्टीकोनही या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

पिप्सी हा चित्रपट येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून गूज हे गाणं ओमकार कुलकर्णी याने शब्दबद्ध केलं आहे.तर देबारपितो यांची उत्तम संगीताची त्याला जोड मिळाली आहे. विशेष म्हणजे आयेशा सय्यद यांच्या सुमधूर आवाजामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसून येत आहे.


गूज या गाण्यातून मायलेकीच्या नात्यावर हळूवार फुंकर घालण्यात आली असून ही मायलेकीच्या नात्यांची सुरेख अंगाई असल्याचं दिसून येतं. ‘पिप्सी’ हा चित्रपट आई आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर आधारित आहे. या चित्रपटातील चानी तिच्या आईचा जीव वाचावा यासाठी जिवलग मित्र बाळूच्या मदतीने ‘पिप्सी’ माश्याची घेताना पाहायला मिळते.