स्टार प्रवाहवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘गोठ’ या मालिकेतील अभय म्हापसेकर या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळत आहे. ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अभिनेता सुशील इनामदारनं पदार्पणातच लक्ष वेधून घेतलं आहे. पोलिस दलात असलेला सुशील मालिकेत खलनायकाची भूमिका साकारतो आहे.

इन्शाल्लाह, हा शेखर खोसला कोण आहे अशा नाटकांतून अभिनेता सुशील इनामदारनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. रंगभूमीवर मिळालेल्या यशानंतर आता थांबायचं नाही म्हणत सुशीलनं स्टार प्रवाहवरील ‘गोठ’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार पदार्पण केलं. सुशील या मालिकेत नकारात्मक छटा असलेली व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या या नकारात्मक भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये खूप संताप असल्याच्या प्रतिक्रिया सुशीलला मिळत आहेत. विशेषत: स्त्रियांकडून त्याच्या भूमिकेविषयी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मालिलेत खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणारा सुशील वास्तविक आयुष्यात मात्र पोलिस कॉन्स्टेबलची भूमिका चोख बजावत आहे.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘म्हापसेकरांच्या घरात बयोआजीनंतर घरात स्वत:चं वर्चस्व मिळवण्यासाठी अभय धडपड आहे.  मात्र, त्याला ते सहजी मिळत नाही. मात्र भडकून न जाता प्रत्येक काम थंड डोक्यानं करतो. या व्यक्तिरेखेला बऱ्याच शेड्स आहे. उत्तम सहकलाकार असल्यानं काम करायलाही मजा येत आहे. प्रेक्षकांच्या मनात अभय म्हापसेकरविषयी असलेला संताप बाहेर वावरताना अनुभवायला मिळत आहे. मध्यंतरी रस्त्यात काही स्त्रियांनी ओळखून अभय म्हापसेकर किती वाईट आहे हे स्पष्ट सांगितलं होतं. आपल्या भूमिकेला असा थेट प्रतिसाद मिळाल्यानं समाधान वाटतं. करत असलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं,’ असं सुशीलनं सांगितलं.