News Flash

गोविंद निहलानी यांचा ‘ती आणि इतर’ लवकरच

प्रगल्भ दिग्दर्शक गोविंद निहलानी या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत आहेत.

ती आणि इतर

‘सायलेन्स इस नॉट अॅन ऑप्शन…’ (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा ‘ती आणि इतर’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. हिंदीचे प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी दिग्दर्शित या आगामी मराठी चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. याचबरोबर अमृता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, सुमन पटेल आणि गणेश यादव  हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

वाचा : शाहरुख, नवाजुद्दीन अडचणीत; ५०० कोटींच्या घोटाळ्यात उघड झाले नाव

चित्रपटाच्या शीर्षकावरून हा सिनेमा ‘स्त्री’ समस्यांवर टिपण करणारा आहे, हे लक्षात येतं. विशेष म्हणजे, अर्धसत्य, आक्रोश, तमस, द्रोहकाल यासारखे वास्तववादी विषय आपल्या चित्रपटाद्वारे मांडणारे प्रगल्भ दिग्दर्शक गोविंद निहालानी या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत असल्यामुळे, मनाला चटका लावून जाणाऱ्या त्यांच्या समाजभिमुख शैलीचा मराठी प्रेक्षकांना अनुभव घेता येणार आहे. लेखिका मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक ‘लाईटस् आऊट’ वर आधारित असलेल्या या सिनेमाचे पटकथा-संवाद शांता गोखले यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची संगीत रचना वसुदा शर्मा यांनी केली आहे.  या चित्रपटाचे गीतकार मंदार चोळकर असून प्रदीप प्रभाकर पांचाळ यांनी संकलनाची धुरा सांभाळली आहे. सचिन पिळगावकर यांचे या चित्रपटात विशेष योगदान आहे. हिमांशू ठाकूर प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहालानी आणि धनंजय सिंह आहेत. येत्या २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

वाचा : अजय देवगणमुळेच मी अजूनही अविवाहित- तब्बू

ti-ani-itar-poster-1

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 4:13 pm

Web Title: govind nihalanis debut in marathi industry by subodh bhave sonali kulkarnis ti ani itar movie
Next Stories
1 हे सेलिब्रिटी कपल त्यांची अॅनिव्हर्सरी विसरले आणि…
2 शाहरुख, नवाजुद्दीन अडचणीत; ५०० कोटींच्या घोटाळ्यात उघड झाले नाव
3 अक्कासाहेबांच्या ‘पुढचं पाऊल’ला पूर्णविराम
Just Now!
X