News Flash

‘गोविंदा आणि अक्षय हे आजही विनोदी भूमिकांचे हुकमी एक्के’

बॉलिवूडमध्ये विनोदी अभिनेता म्हणून जॉनी लिव्हरचे नाव आजही अग्रक्रमाने घेतले जाते. खास जॉनी लिव्हरसाठी म्हणून छोटी का होईना व्यक्तिरेखा लिहिली जाते.

| October 12, 2014 06:14 am

बॉलिवूडमध्ये विनोदी अभिनेता म्हणून जॉनी लिव्हरचे नाव आजही अग्रक्रमाने घेतले जाते. खास जॉनी लिव्हरसाठी म्हणून छोटी का होईना व्यक्तिरेखा लिहिली जाते. मात्र, सध्या विनोदी चित्रपटांची लाट काहीशी कमी झाल्याने जॉनी लिव्हर यांचा विनोदी अभिनय पाहण्याची संधी फार कमी मिळते. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘एंटरटेन्मेट’ या चित्रपटात जॉनी लिव्हर यांनी काम केले आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर झी टीव्हीवर दाखवण्यात येणार असून त्यानिमित्ताने बोलताना गोविंदा आणि अक्षय कुमार हे आजही विनोदी भूमिकांचे हुकूमी एक्के आहेत, असे मत जॉनी लिव्हर यांनी ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केले.
विनोदी चित्रपटांची एक लाट होती. आता ती काहीशी कमी झाली आहे. मात्र, त्याबद्दल आपल्याला खंत वाटत नाही. उलट विविध विषयावरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याने तसे चित्रपट बनत असल्याबद्दल आनंद वाटतो, असे त्यांनी सांगितले. जॉनी लिव्हर यांनी आत्तापर्यंत गोविंदा, संजय दत्त, अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यांबरोबर अनेक विनोदी चित्रपट केले आहेत. अक्षयबरोबर तर अगदी ‘खिलाडी’ पासूनचे संबंध आहेत. त्याच्याबरोबर काम करताना मजा येते. त्याला स्वत:ला विनोदाची उत्तम जाण आहे. आणि अशा कलाकारांबरोबरच विनोदी भूमिका करायला आपल्याला आवडत असल्याचे जॉनी लिव्हर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 6:14 am

Web Title: govinda and akshay kumar comedy actors johny lever
टॅग : Bollywood
Next Stories
1 ‘गुरूदत्त’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन
2 अमिताभ यांच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंबियांचा खास बेत
3 महानायकाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…
Just Now!
X