News Flash

सलमान आणि केआरकेच्या भांडणात गोविंदाला खेचले, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाला…

गोविंदाने एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टीवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कमाल आर खान सतत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर टीका करत आहे. तर मध्यांतरी केआरकेने ट्वीट करत गोविंदाने त्याला पाठिंबा दिला आहे असं म्हणतं त्याचे आभार मानले होते. मात्र, गोविंदाला त्यांच्या या वादात खेचल्याने गोविंदा संतापला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गोविंदाने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. “मी केआरकेला पाठिंबा देत आहे, असे मी काही ठिकाणी वाचले. मी बर्‍याच वर्षांपासून केआरकेच्या संपर्कात नाही, मीटिंग नाही, फोन कॉल केला नाही किंवा मी कधीही त्याला मेसेज केला नाही. माझ्या नावाने आणखी एक व्यक्ती असू शकते, ज्याला ट्वीटमध्ये केआरकेने टॅग केलं आहे. स्वत: ला सगळ्यात उत्कृष्ट चित्रपट समिक्षक म्हणणाऱ्या केआरकेने तर माझ्या चित्रपटासोबत माझ्या बद्दल सुद्धा अनेक चुकीचे वक्तव्य केले आहेत,” असे गोविंदा म्हणाला.

आणखी वाचा : “माझा पती काही कामाचा नाही आणि…”, अनिता हसनंदानीने शेअर केले पतीसोबतचे चॅट

गोविंदा पुढे म्हणाला, “सलमान आणि केआरके यांच्यात खरं कोणत्या गोष्टीवरून वाद सुरु आहे हे मलासुद्धा माहिती नाही, परंतु माझं नाव मध्येच घेतलं आहे. असे एकदा या आधी झाले होते. एक दुसऱ्या चित्रपट समिक्षक कोमल नाहटाने माझे नाव घेतले होते, कार्तिक आर्यनच्या हातातून काही चित्रपट गेल्यानंतर त्यांनी माझं नाव मध्ये घेतलं होतं. मला असं वाटतं की करोना काळात या दोन्ही गोष्टींचा अजेंडा बनविण्याचा प्रयत्न केला जातं आहे.”

आणखी वाचा : “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप

दरम्यान, सलमानच्या टीमने केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. चित्रपटाचा रिव्हू्य दिल्याने मानहानीचा दावा दाखल केला असा आरोप केआरकेने केला होता. मात्र, ही गोष्ट चुकीची असल्याचे सलमानच्या टीमने सांगितले आहे. “सलमान भ्रष्टाचारी आहे, आणि त्याचे ब्रॅंड ‘बिंग ह्युमन’ हे सगळ्यांची फसवणूक, हेराफेरी आणि ते मनी लॉंड्रींगच्या व्यवसायात गुंतले आहेत”, असा आरोप केआरकेने केला त्यामुळे त्याच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 1:04 pm

Web Title: govinda reacts on his name being dragged by krk or kamaal r khan in legal battle with salman khan dcp 98
Next Stories
1 पॉर्नस्टारसोबत मैत्री केल्याने अभिनेत्रीला बसला फटका
2 “माझा पती काही कामाचा नाही आणि…”, अनिता हसनंदानीने शेअर केले पतीसोबतचे चॅट
3 लंडनला एकत्र फिरायला जाण्यासाठी अमिताभ-जया यांनी घेतला होता लग्नाचा निर्णय
Just Now!
X