12 November 2019

News Flash

गोविंदाने सहा वेळा बदललं नाव; ‘हे’ आहे त्याचं खरं नाव

बॉलिवूडमध्ये कलाकारांनी स्वत:चं नाव बदलणं काही नवीन नाही. पण गोविंदाने सहा वेळा नाव बदललं आहे.

गोविंदा

गोविंदा हा विनोदी भूमिकांचा हुकूमी एक्का मानला जातो. एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या गोविंदाने नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत पत्नी सुनीता व मुलगी टीनासुद्धा उपस्थित होती. या कार्यक्रमात गोविंदाने स्वत:विषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. याच वेळी त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तब्बल सहा वेळा स्वत:चं नाव बदलल्याचा खुलासा केला.

बॉलिवूडमध्ये कलाकारांनी स्वत:चं नाव बदलणं काही नवीन नाही. पण गोविंदाने सहा वेळा हे नाव बदललं आहे. त्याचं खरं नाव गोविंदा अहुजा असून त्याने गोविंदा राज, राज गोविंदा, अरुण गोविंद अशी वेगवेगळी नावं ठेवली होती. नव्वदीच्या दशकात गोविंदाची चांगलीच क्रेझ होती. त्याला इंडस्ट्रीत ‘चिची’ म्हणूनही हाक मारतात.

आणखी वाचा : कोंडाजी बाबांची भूमिका करणारे आनंद काळे खऱ्या आयुष्यात कसे आहेत?

बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणाऱ्या गोविंदाचे चित्रपट सध्या चालत नाहीत. काही महिन्यांपूर्वी ‘रंगीला राजा’ या चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती. पहलाज निहलानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला होता. गोविंदाच्या मुलीचा म्युझिक अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त तो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता.

First Published on October 15, 2019 12:18 pm

Web Title: govinda reveals he changed his name six times before entering bollywood ssv 92