01 October 2020

News Flash

गोविंदाला ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचे होते आणखी काम

त्याने एका कार्यक्रमात हे व्यक्तव्य केले आहे.

लॉकडाउननंतर पुन्हा प्रसारित होऊ लागलेल्या ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या शोने प्रेक्षकांच्या मनाची पकड पुन्हा एकदा घेतली आहे. आपल्या अप्रतिम आवाजाने या शोमधील बालस्पर्धकांनी परीक्षक, ज्यूरी आणि प्रेक्षकांवर वेगळीच छाप उमटवली. तसेच शोमधील स्पर्धकांनी पाहुणे म्हणून येणाऱ्या परीक्षकांची देखील मने जिंकली आहेत. आता शोच्या आगामी ‘कॉमेडी विशेष’ भागात बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदा सहभागी होणार आहे. दरम्यान गोविंदाने एका अभिनेत्रीसोबत आणखी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कार्यक्रमामध्ये बालस्पर्धकांनी गोविंदाच्या हिट चित्रपटातील गाणी सादर केली आहेत. ते ऐकून गोविंदा आनंदी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान शोचा सूत्रसंचालक मनीष पॉलने गोविंदाला बॉलिवूड अभिनेत्रींसंबधी अनेक प्रश्न विचारले आहेत. रवीना टंडन, जूही चावला, करिष्मा कपूर किंवा माधुरी दीक्षित यापैकी आवडती अभिनेत्री कोणती असा प्रश्न विचारताच गोविंदाने मनातील एक इच्छा व्यक्त केली आहे.

“माधुरीजी सोडल्यास यापैकी प्रत्येक अभिनेत्रींबरोबर मी अर्धा डझन तरी चित्रपट केले आहेत. खरं तर रवीनाबरोबर मी इतक्या चित्रपटांत एकत्र भूमिका साकारेन असं मलाही वाटलं नव्हतं. पण तसं झालं. तेव्हा आम्ही एकमेकांना खूप सांभाळून घेतलं. माधुरीजींबरोबरही मला इतक्या प्रमाणावर चित्रपटांतून भूमिका साकारता आल्या असत्या, तर बरं झालं असतं, असं मला वाटतं!” असं गोविंदा म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 7:13 pm

Web Title: govinda wants to work with madhuri avb 95
Next Stories
1 कोंकना सेन शर्मा व रणवीर शौरी यांचा घटस्फोट
2 संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच ऑनस्क्रीन ‘संजू’ने घेतली भेट
3 सुशांत मृत्यू प्रकरण: कंगना रणौतचा संजय राऊत यांना उपरोधिक टोला; म्हणाली…
Just Now!
X