संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणा-या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ५९वे वर्ष आहे. संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार सोहळा लॉस एन्जलिस येथील स्टॅपल्स सेंटर येथे पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जेम्स कॉर्डन यांनी केले. या पुरस्कार सोहळ्यात संगीत क्षेत्राशी जोडलेल्या सर्व गायक, संगीतकारांनी हजेरी लावली होती.

पॉप सुपरस्टार बियॉन्स यावेळी अभिमानाने तिचे गरोदरपण मिरवताना दिसली. लॉस एन्जलिसमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात बियॉन्सने राजकीय वक्तव्य आणि हळव्या शब्दांतील श्रद्धांजलीद्वारे एक वेगळेच वातावरण निर्माण केले होते. १२ दिवसांपूर्वीच बियॉन्सने तिला जुळी मुलं होणार असल्याची घोषणा केली होती. झगमगीत सोनेरी रंगाचा शीर गाउन तिने परिधान केला होता. स्त्रीवाद, वंश आणि विश्वासघात यावर आधारित असलेल्या तिच्या ‘लेमनेड’ अल्बममधील ‘लव्ह ड्रॉट’ आणि ‘सॅन्डकॅल्स’ ही भावनिक गाणी तिने सादर केली. यावेळी ब्रिटीश पॉप गायक जॉर्ज मिशेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ग्रॅमी पुरस्कार २०१७ विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट पदार्पण- चान्स द रॅपर
सर्वोत्कृष्ट पॉप व्होकल अल्बम- अडेल
सर्वोत्कृष्ट गाणे- हॅलो (अडेल, ग्रेग कर्सटीन)
सर्वोत्कृष्ट रॅप गाणे- हॉटलाइन ब्लिंग (ड्रेक, नाइनटीन ८५)
सर्वोत्कृष्ट मेटल परफॉर्मन्स- डायस्टोपिया
सर्वोत्कृष्ट रॉक गाणे- ब्लॅकस्टार (डेव्हिड बॉवी)
सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम- टेल मी आय अॅम प्रिटी (केज द एलिफन्ट)
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स- हॅलो (अडेल)
सर्वोत्कृष्ट गीत लेखन (मोशन पिक्चर)- कान्ट स्टॉप द फिलिंग
सर्वोत्कृष्ट डान्स रेकॉर्डिंग- डोन्ट लेट मी डाउन (द चेनस्मोकर्स)
सर्वोत्कृष्ट अर्बन कंटेम्पररी नंबर- लेमनेड (बियॉन्स)
सर्वोत्कृष्ट म्युझिकल थेटर अल्बम- द कलर पर्पल (२०१५ ब्रॉडवे कास्ट रेकॉर्डिंग)
सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ- फॉर्मेशन (बियॉन्स)