News Flash

“प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

रश्मी गुप्ताची प्रियकराने केली फसवणूक

“प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ या टीव्ही मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रश्मी गुप्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. सध्या रश्मी आपल्या एक्स बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. माझ्या एक्स बॉयफ्रेंडने मला फसवून दुसऱ्याच एका अभिनेत्रीसोबत लग्न केलं, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत रश्मीने आपल्या रिलेशनशिपवर भाष्य केलं. ती म्हणाली, “ये वादा राहा या मालिकेच्या निमित्ताने आमची भेट झाली होती. एकत्र काम करत होतो त्यामुळे आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली. एका पार्टीत त्याने मला प्रपोज केलं. परंतु सुरुवातीला मी त्याला नकार दिला. जवळपास दोन महिने तो माझ्या होकाराची वाट पाहात होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना देखील मी भेटले होते. त्याच दरम्यान मी त्याला होकार दिला. काही महिने आमच्या दोघांमध्ये सर्व काही ठिक होतं. त्यानंतर अचानक तो एका दुसऱ्याच अभिनेत्रीला डेट करत असल्याची माहिती मला मिळाली. मी त्याला याबाबत विचारची पण तो उडवाउडवीची उत्तरं देऊन विषय टाळायचा. आणि एके दिवशी त्याने माझ्यासोबत ब्रेकअप करुन दुसऱ्याच एका अभिनेत्रीसोबत लग्न केलं.” असा अनुभव रश्मीने सांगितला.

रश्मी गुप्ता एक टीव्ही अभिनेत्री आहे. २०१५ मध्ये ये वादा रहा या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने हेमा त्रिपाठी ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर सीआयडी, कौन है, ये वादा राहा यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं. ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. सध्या ती एका वेब सीरिजमध्ये काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 4:02 pm

Web Title: guddan tumse naa ho paayega actress rashmi gupta ex boyfriend cheated mppg 94
Next Stories
1 टोकियो इंडी फिल्म महोत्सवात ‘येरे येरे पावसा’वर पुरस्कारांचा वर्षाव
2 ‘ड्रग्ज आहेत का?’ ट्रोलरच्या प्रश्नावर अभिषेक बच्चनचे सडेतोड उत्तर
3 ‘दाह’ या रविवारी झी टॉकीज वर प्रेक्षकांच्या भेटीस
Just Now!
X