27 September 2020

News Flash

फोटोतील चिमुकल्याला ओळखलंत का? आता स्वार्थी मुलाच्या भूमिकेसाठी आहे प्रसिद्ध

विशेष म्हणजे ही त्याची पहिलीच मालिका असूनसुद्धा त्याने दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

फोटोमधील या चिमुकल्याला ओळखलंत का? हा चिमुकला आता मोठा झाला असून मराठीतील एका लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे ही त्याची पहिलीच मालिका असूनसुद्धा त्याने दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याची भूमिका जरी नकारात्मक असली तरी प्रेक्षकांकडून त्याला त्याच्या कामाची पोचपावती मिळत आहे. तर फोटोतला हा चिमुकला आहे अभिनेता आशुतोष पत्की. झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत सोहम ऊर्फ बबड्याची भूमिका साकारणारा आशुतोष पत्की.

आशुतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. आशुतोषच्या फॅनक्लब पेजने हा फोटो पोस्ट केला होता. आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या आशुतोषचा कमी कालावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यात तेजश्रीने शुभ्रा ही भूमिका साकारली आहे. तर आशुतोष बाबड्या उर्फ “सोहम” ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 1:07 pm

Web Title: guess this child in this photo who is now popular for portraying selfish son on television ssv 92
Next Stories
1 तुला महात्मा गांधी दिसतात का?; शाहरुखच्या प्रश्नावर संजय दत्त म्हणाला…
2 ‘संपत्ती दान का करत नाही?’बिग बींनी दिलं सडेतोड उत्तर; म्हणाले…
3 धनुष उठा प्रहार कर; करोना पॉझिटिव्ह अभिषेकला बिग बींनी दिलं प्रोत्साहन
Just Now!
X