करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात २१ दिवस लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांनी घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. काही काळ शूटिंग बंद असल्याने सेलिब्रिटीसुद्धा घरीच कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. सोशल मीडियाद्वारे हे सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी घरी बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका अभिनेत्याने त्याच्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

‘व्हॉट्स अप ब्रदर..’ असं म्हणत या लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या भावासोबतचा हा फोटो पोस्ट केला आहे. सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का? या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला मुलगा ‘मसान’, ‘राजी’, ‘उरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल आहे व त्याच्या बाजूला निळ्या टी-शर्ट परिधान केलेला त्याचा भाऊ सनी कौशल आहे. विकीच्या लहानपणीच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा : …म्हणून अक्षय खन्ना आजही अविवाहित

विकी केवळ प्रकाशझोतातच आला नाही तर त्याने लोकप्रियतेचं शिखरही गाठलं. लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने शाहिद कपूर, टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यन या कलाकारांनाही मागे टाकलं आहे.