सेलिब्रिटींसाठी चाहत्यांशी संपर्कात राहायचं सर्वांत सोपं आणि उपलब्ध असलेलं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. लॉकडाउनमुळे शूटिंग जरी बंद असले तरी सोशल मीडियाद्वारे हे सेलिब्रिटी चाहत्यांशी गप्पा मारत आहेत. कधी फोटो, कधी व्हिडीओ तर कधी व्हिडीओ मुलाखतींद्वारे विविध सेलिब्रिटी चाहत्यांशी ‘कनेक्टेड’ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाउनमधील फावल्या वेळेत अनेकांनी जुने अल्बम किंवा फोनमधील जुने फोटो पाहून आठवणींना उजाळा दिला असेल. अशीच एक आठवण अभिनेता देवदत्त नागेने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. देवदत्त १७ वर्षांचा होता तेव्हाचा आणि आताचा फोटो असे दोन फोटो त्याने पोस्ट केले आहेत. ‘१७ वर्षे वय ते १७ इंच दंड.. असा झाला बदल’ म्हणत देवदत्तने हा फोटो पोस्ट केला आहे. फिटनेसच्या बाबतीत देवदत्त खूप सजग असतो.

Zee Natya Gaurav 2024 full list of winners
झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Majhya Navaryachi Bayko fame actor mihir Rajda played Bhakt Pralhad and Young Sudama in TV Serial Shri Krishna of Ramanand Sagar
रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ मालिकेतील चिमुकल्याला ओळखलंत का? मराठी मालिकेत अभिनेता, लेखक म्हणून केलंय काम
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

पाहा फोटो : कांजीवरम साडी, पारंपरिक दागिने.. साखरपुड्यासाठी सोनालीचा असा साजश्रृंगार

देवदत्तच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. खंडोबाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकलेला देवदत्त ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळाला. देवदत्तने अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. तान्हाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे यांची भूमिका देवदत्तने साकारली होती. त्याचा हा दुसरा बॉलिवूड चित्रपट असून याआधी त्याने ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती.