13 August 2020

News Flash

ओळखलंत का या लोकप्रिय अभिनेत्याला?

हा मुलगा आता मराठीतील लोकप्रिय अभिनेता असून तरुणाईमध्ये तो फार प्रसिद्ध आहे.

अमेय वाघ

फोटोमधील या लहान मुलाला ओळखलंत का? हा मुलगा आता मराठीतील लोकप्रिय अभिनेता असून तरुणाईमध्ये तो फार प्रसिद्ध आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फास्टर फेणे’ हे चित्रपट तर ‘अमर फोटो स्टुडिओ’ यांसारख्या नाटकातून आपल्या अभिनयानं त्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावरही त्याची क्रेझ पाहायला मिळते. तर हा अभिनेता आहे अमेय वाघ.

अमेयने शिवजयंतीनिमित्त इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. आयुष्यात पहिल्यांदा गॅदरिंगमध्ये भाग घेतला तेव्हा बाल शिवाजी झालो होतो आणि पहिल्यांदा टीव्हीवर काम मिळालं तेही बाल शिवाजी म्हणूनच.. हे माझं भाग्य, असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. अमेयच्या या फोटोला भरभरून लाइक्स व कमेंट्स मिळत आहेत.

आणखी वाचा : डॉ. अमोल कोल्हेंनी उलगडली मालिकेसोबत झालेल्या राजकारणाची गोष्ट

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या अमेयने ‘दळण’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘नटसम्राट’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या नाटकांमध्ये काम केलंय. तर ‘पोपट’, ‘फास्टर फेणे’, ‘शटर’, ‘घंटा’, ‘गर्लफ्रेंड’, ‘मुरंबा’, ‘धुरळा’सारख्या अनेक चित्रपटांत त्याने अभिनय केला आहे. याशिवाय अमेयची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही टीव्ही मालिकाही चांगलीच गाजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 4:59 pm

Web Title: guess this popular marathi actor ssv 92
Next Stories
1 ‘…तर तुझ्या आई-वडिलांचा उद्धार करण्यास मागे-पुढे पाहणार नाही’; नेहा संतापली
2 रजनी Vs Wild: बेअर ग्रिल्ससोबत ‘थलायवा’ करणार शिकार
3 आशा भोसलेंनाही भावली ‘अग्गंबाई सासूबाई’मधील आसावरी
Just Now!
X