जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा येत्या ६ ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. विराग वानखेडे यांनी या सिनेमाचे लेखन- दिग्दर्शन केले आहे. ‘डॉ. तात्या लहाने… अंगार पावर इज विदीन’ असे या सिनेमाचे नाव आहे. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या सिनेमाच्या शीर्षक गीतावर हा रेकॉर्ड झाला आहे. विराग वानखेडे यांच्या नावावर आधी तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्यामध्ये अजून एका विक्रमाची भर पडली.

‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

विराग यांनी ३२७ गायकांना एकत्र घेऊन सिनेमाचे शीर्षक गीत गायले. एवढ्या गायकांना एकत्र घेऊन गायलेल्या या शीर्षक गीताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. याआधी २९६ गायकांनी एकत्र गात विक्रम केला होता. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे सर्वांनी एकत्र न गाता गाण्यातील एक- एक शब्द प्रत्येकाने गायले. गाण्यामध्ये एकूण १०९ शब्द होते.

रिले सिंगिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या ऑडिशन्समधून मुंबई/ठाणे (१२५), पुणे (१८), नाशिक (१२), सांगली (७), धुळे (२०), जळगाव (३०), जालना(६), अकोला (११), अमरावती (१७), नागपूर (११), वाशिम (१५), लातूर(१६), परळी (२), कोल्हापूर(८) सोलापूर (३) मधून ३२७ उत्तम गायक या उपक्रमात सहभागी झाले होते. अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अलका कुबल यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एमा स्टोन ठरली सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री

तात्याराव लहाने हे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून परिचीत आहेत. त्यांनी २ लाखांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया केल्या असून अनेक गोरगरिबांना दृष्टी दिली आहे. त्यामुळेच तात्यांचं हे काम मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न विराग वानखेडे यांनी केला आहे.