04 August 2020

News Flash

मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही ‘पद्मावती’वर बंदी

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा निर्णय

'पद्मावती'

मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी हा चित्रपट तिथे प्रदर्शित होणार नसल्याची घोषणा केली. चित्रपटाला होत असलेला तीव्र विरोध आणि पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘चित्रपटाचे कथानक आणि त्यातील काही दृष्यांवरून वाद सुरु आहेत. राजपूत संघटनांनी याला विरोध केला आहे. निवडणुका जवळ आल्याने आम्हाला कोणतेही वाद नकोत. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न मोठा आहे. म्हणूनच ‘पद्मावती’ चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे रुपानी म्हणाले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले. ‘आम्ही इतिहासाची मोडतोड करू देऊ शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमचा विरोध नाही, पण आपल्या संस्कृतीशी छेडछाड केल्याचे खपवून घेतले जाणार नाही,’ असे त्यांनी ट्विटरवर म्हटले.

दरम्यान, ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी पुढे ढकलली आहे. आधी १ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तेथे चित्रटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. याशिवाय राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चित्रपटात अपेक्षित बदल केल्याशिवाय तो तेथे प्रदर्शित करू नये अशी मागणी केली आहे.

एकीकडे राजपूत संघटनांकडून भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणला धमक्या देण्याचे सत्र अजूनही सुरुच आहे. तर दुसरीकडे, गेल्या आठवड्यात सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक बदलांची कारणे देत चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला. त्यामुळे आता चित्रपट नेमका प्रदर्शित कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘पद्मावती’ चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये दीपिका राणी पद्मिनीची, शाहिद कपूर महारावल रतन सिंहची तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2017 9:25 am

Web Title: gujarat government bans sanjay leela bhansali padmavati deepika padukon shahid kapoor ranveer singh
Next Stories
1 अरेच्चा, ही तर स्वानंदी!
2 नाटक-बिटक : ‘रंगसंगीत एकांकिका स्पर्धा’ नवीन रंगभाषा घडवतेय
3 आश्काच्या लेहंग्याला ‘बॉलिवूड टच’
Just Now!
X