23 April 2019

News Flash

Gujarati Ventilator Poster : ‘अखेर मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली’

गुजराती व्हेंटिलेटर' १४ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

गुजराती ‘व्हेंटिलेटर’

प्रियांका चोप्राच्या ‘पर्पल पिक्चर्स’ची निर्मिती असलेला आणि राजेश म्हापूसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी चित्रपट खूपच हिट झाला. तीन राष्ट्रीय पुरस्कारावर या चित्रपटानं आपली मोहर उमटवली. याव्यतिरिक्तही या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. या चित्रपटाचा गुजराती भाषेत रिमेक येत आहे. गुजराती ‘व्हेंटिलेटर’चा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

उमंग व्यास या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून गुजराती व्हेंटिलेटर’ १४ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं जॅकी श्रॉफ गुजराती चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. ‘अखेर मला माझ्या मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी खूप खूश आहे. शिवाय चाहत्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन अशी मला आशा आहे,’ असं म्हणत जॅकी श्रॉफ यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जॅकी श्रॉफ जग्गु दादाची भूमिका साकारणार आहे, मराठी व्हेंटिलेटरमध्ये ही भूमिका आशुतोष गोवारीकर यांनी साकारली होती. या चित्रपटात गुजराती रंगभूमीवरचे अनेक कलाकारही पाहायला मिळणार आहेत.

First Published on August 10, 2018 2:23 pm

Web Title: gujarati ventilator poster launch jackie shroff