News Flash

..म्हणून गुल पनागने आई झाल्याची बातमी सहा महिने ठेवली लपवून

विशेष म्हणजे गुल पनागने ही गोष्ट साऱ्यांपासून लपून ठेवली होती.

नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘डोर’ चित्रपटामुळे चाहत्यांच्या मनात स्थान मिळविणारी अभिनेत्री गुल पनागने मोठ्या पडद्यापासून फारकत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी गुल पनाग सध्या आम आदमी पक्षामध्ये कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय. राजकारणामुळे चर्चेत राहणारी गुल पनाग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली असून तीने वैयक्तिक आयुष्याबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे.

गुल पनागने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये साऱ्यांनाच धक्का बसेल अशा गोष्टीचा खुलासा केला आहे. गुल पनागला सहा महिन्यांपूर्वीच मुलगा झाला असून त्याच नाव निहाल असल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे गुल पनागने ही गोष्ट साऱ्यांपासून लपून ठेवली होती. गुल पनागला मुलगा झाल्याची माहिती केवळ तिच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवारालाच असल्याचं समोर आलं आहे.

‘सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असल्यामुळे अनेक जण त्या माध्यमातून आपले किंवा आपल्या मुलांचे फोटो शेअर करत असतात. मात्र मला आणि माझ्या पतीला कायमच खासगी आयुष्य सर्वांसमोर उघड करायला आवडत नाही. त्यातच आमच्या बाळाचा अनुभव आम्हाला घ्यायचा होता. सतत सोशल मीडियावर त्याला आणत त्याचा आणि आमचा आनंद हिरावून घ्यायचा नव्हता, असं यावेळी गुल पनाग म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘माझं बाळ नऊ महिन्यांपूर्वीच जन्माला आल्यामुळे मला सतत त्याची काळजी घेणं गरजेचं होतं. त्यामुळे मी माझा जास्तीत जास्त वेळ त्याला देण्याचा प्रयत्न करत होते’. मात्र गुल पनागने केलेल्या या खुलाशामुळे साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 3:04 pm

Web Title: gul panag has a 6 month old baby here s why she kept it all a secret
Next Stories
1 अक्षय-करिनाची जोडी देणार ‘गुड न्युज’
2 सिनेरसिकांसाठी मेजवानी, या शुक्रवारी प्रदर्शित होणार चार चित्रपट
3 ..जेव्हा रणबीर- बिग बी ‘डेट’ला जातात तेव्हा
Just Now!
X