News Flash

मिर्झा आणि बंकीची प्राइस्लेस जोडी; पाहा ‘गुलाबो सिताबो’चा भन्नाट ट्रेलर

अमिताभ आणि आयुषमानची अनोखी जुगलबंदी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. “पाहा मिर्झा आणि बंकी यांच्या भन्नाट जोडीला” असं म्हणत अॅमेझॉन प्राईमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्रेलर विषयी माहिती देण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये अमिताभ आणि आयुषमानची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे.

अवश्य पाहा – ‘महाभारता’मध्ये या WWE सुपरस्टारने साकारलेली ‘भीम’ ही व्यक्तिरेखा

अवश्य पाहा – विकासचा छोटा भाऊही आला; ‘आत्मनिर्भर’वरून अभिनेत्याचा मोदींना टोला

‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट गेल्या दिवसांत प्रचंड चर्चेत आहे. करोनाचे वाढते संक्रमण आणि लॉकडाउनमुळे चित्रपट आता अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे सिनेमागृहांचे मालक आणि चित्रपट निर्माते यांच्यात एक अनोखे व्दंद निर्माण झाले. त्यांनी चित्रपट OTTवर येण्यास आपला विरोध दर्शवला. आयनॉक्सने तर अधिकृत पत्रकच जारी केले होते. या संपूर्ण वाद विवादांमुळे ‘गुलाबो सितोबो’बाबत प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ‘गुलाबो सिताबो’ येत्या १२ जूनला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 5:10 pm

Web Title: gulabo sitabo official trailer amitabh bachchan ayushmann khurrana mppg 94
Next Stories
1 विद्युत जामवालने सिगारेटने कापलं लिंबू; पाहा भन्नाट व्हिडीओ
2 अम्फनमुळे प.बंगालची वाताहत; फोटो शेअर करत करीना म्हणाली…
3 रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये WWEमधील सुपरस्टारची एण्ट्री?
Just Now!
X