08 March 2021

News Flash

गुलाम अलींचा मुद्दा राजकीय झालायं- अमिताभ बच्चन

दिवसरात्र मी सोशलमिडियावर स्वतःबद्दलची माहिती देत असतो. त्यामुळे आता मीदेखील पत्रकार झालोय असे वाटतेयं.

गुलाम अली यांचा मुद्दा हा राजकीय झाला आहे. आम्ही राजकारणाचा भाग नाही, त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. आज बॉलीवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांचा ७३वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माझे कुटुंबिय नेहमीच माझ्यासोबत असते. त्यांच्यामुळे आणि चाहत्यांच्या प्रेमामुळे आज मी इथवर पोहोचलोयं, असे अमिताभ यांनी म्हटले. सध्या दिवसरात्र मी सोशलमिडियावर स्वतःबद्दलची माहिती देत असतो. त्यामुळे आता मीदेखील पत्रकार झालोय असे वाटतेयं. दरम्यान, एफटीआयआयमध्ये सुरु असलेल्या वादाबद्दल त्यांचे काय मत आहे, असे विचारले असता अमिताभ म्हणाले की,  या प्रकरणी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. लवकरच योग्य तोडगा काढला जाईल, असा मला विश्वास वाटतोयं.
सर्व चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी अमिताभ यांनी यावेळी मनपूर्वक आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 3:36 pm

Web Title: gulam alis issue is become political now said amitabh bachchan
Next Stories
1 महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध संवाद
2 ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात मराठमोळा पोवाडा
3 बदलत्या काळातील बदलत्या कुटुंबाची गोष्ट
Just Now!
X