News Flash

दिल थोड़ा सहम तो जाता है…; करोनाच्या वेदना अभिनेता सिद्धांतने कवितेतून केल्या व्यक्त

सिद्धांतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल...

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने ‘गली बॉय’ या चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. सिद्धांत फक्त त्याच्या अभिनयामुळे नाही तर शेर-शायरी आणि कवीतांसाठी देखील ओळखला जातो. तो एक उत्तम कवी देखील आहे. सिद्धांतने यावेळी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर एक कविता लिहली आहे. या कवितेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सिद्धांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सिद्धांतने करोनावर निर्माण झालेल्या परिस्थितीवर ही कविता केली आहे. ही कविता ऐकल्यावर प्रत्येक व्यक्ती ही भावूक होते. “खिड़की पर बैठते ही फिर वही गुजरती हैं एम्बुलेंस की आवाजें हर सेकंड जैसे कोई अपना आखिरी सांसें ले रहा हो”, अशा आशयाची कविता पोस्ट करत त्यांने वास्तव मांडलं आहे. सिद्धांतने ही कविता शेअर केल्यानंतर बॉलिवूड कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. दीया मिर्झा, कृती सॅनॉन, फरहान अख्तर, सियामी खेर सारख्या अनेक कलाकारांनी सिद्धांतच्या या कवितेवर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, सिद्धांतने पहिल्यांदाचा करोनावर कोणती कविता शेअर केली नाही. तर, गेल्या वर्षी देखील सिद्धांतने करोनावर एक कविता शेअर केली होती.

सिद्धांत लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धांतसोबत दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:59 pm

Web Title: gully boy actor siddhant chaturvedi s poem on situations after coronavirus dcp 98
Next Stories
1 हिनाला पाहून फोटोग्राफर्सचा गोंधळ; “तिने वडिलांना गमावलंय आणि तुम्ही..” विकास गुप्ता भडकला
2 अभिनेता चिरंजीवीची मोठी घोषणा! सिने कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस
3 एकेकाळी बँकेत ‘हे’ काम करायचे एसीपी प्रद्युमन; शिवाजी साटम यांचा प्रवास
Just Now!
X