News Flash

‘गली बॉय’ची बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाईची

हा चित्रपट लवकरच ७५ कोटींचा टप्पा गाठणार आहे

'गली बॉय'

प्रदर्शनापूर्वीच बहुचर्चित ठरलेला गली बॉय चित्रपट अखेर १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली.मात्र त्यानंतर गली बॉयच्या कमाईची गाडी थोडी मंदावली. त्यानंतर आता पाच दिवसानंतर या चित्रपटाने ७० कोटींचा टप्पा पार केल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.

झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सादर करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकले असून त्यांच्या अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. विशेष म्हणजे हॉलिवूड अभिनेता विल स्मिथनेदेखील रणवीरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

चित्रपटाच्या याच लोकप्रियतेमुळे या चित्रपटाने आतापर्यंत ७२.४५ कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच गली बॉय ७५ कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं आहे.

गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.४० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर अनुक्रमे दुसऱ्या दिवशी १३.१० ,तिसऱ्या दिवशी १८.६५ आणि रविवारी २१. ३० रुपयांचा गल्ला जमविला होता. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ७२.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 2:16 pm

Web Title: gully boy box office collection the ranveer singh alia bhatt film
Next Stories
1 Pulwama Attack : टी- सीरिजनं युट्यूबवरून हटवली पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान- आतिफ अस्लमची गाणी
2 Pulwama Attack: ‘चार दिवस सगळे रडतील नंतर शहीदांना विसरतील’
3 ‘ही’ अभिनेत्री साकारणार पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका
Just Now!
X