झोया अख्तर दिग्दर्शित रणवीर- आलियाचा ‘गली बॉय’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा ‘गली बॉय’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार असून काही दिवसापूर्वी या चित्रपटातील ‘अपना टाईम आयेगा’ हे पहिलं गाण प्रदर्शित झालं होतं. हे गाणं खुद्द रणवीरने गायलं असून ते रॅप साँग होतं. हे रॅप साँग ऐकल्यानंतर प्रेक्षकांच्या या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता वाढली . त्यातच या चित्रपटातील ‘मेरे गली में’ हे दुसरं गाणंही प्रदर्शित झालं आहे.
‘मेरे गली में’ असे बोल असलेल्या या गाण्यात रणवीर एका हटके अंदाजात दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे गाणंदेखील रॅप साँग प्रकारात मोडणारं आहे. त्यामुळे हे गाणं सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. या गाण्यामधून झोपडपट्टीतील वास्तवावर प्रकाश टाकण्यात आला आहे. घरं जरी लहान असली,तरी येथे राहणाऱ्या माणसांची मनं आणि त्यांची स्वप्न मोठी असतात, हे या गाण्यातून सांगण्यात आलं आहे. २ मिनीटे ५६ सेकंद असलेल्या या गाण्यात रणवीरसोबत डिव्हाइनदेखील दिसून येत आहे.
दरम्यान, हे गाणंसुद्धा रणवीर सिंगने गायलं असून डब शर्मा आणि डिव्हाइन यांनी कंपोज केलं आहे.रणवीरने ट्विट करत हे गाणं शेअर केलं आहे.
#MereGullyMein Out Now ! https://t.co/6zyOLl42RE@ritesh_sid #ZoyaAkhtar @FarOutAkhtar @tigerbabyindia @aliaa08 @SiddhantChturvD @kalkikanmani @kagtireema @ZeeMusicCompany @VivianDivine @NaezyTheBaA @ankurtewari @sezonthebeat #GullyBoy
— Ranveer Singh (@RanveerOfficial) January 22, 2019
मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 11:10 am