कोणतही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं असो, आई मुलाचं किंवा नवरा बायकोचं. नातेसंबंध आणि त्यात असणारं प्रेम वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणावं या उद्देशाने झी युवावर २२ जानेवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता ‘गुलमोहर’ ही प्रेम, भावना आणि नातेसंबंध यावर आधारित विविध कथा सांगणारी नवीन मालिका सुरु होत आहे.

वाचा : कोण म्हणतं मी प्रभासशी लग्न करणार – अनुष्का शेट्टी

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!

गुलमोहरमध्ये नाते संबंधांवर आधारित एक सुंदर अनुभव अनुभवायला मिळेल. या मालिकेतून अनेक मोठे आणि आवडते कलाकार प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. पहिली गोष्ट ही आयुष्यात हसणं कसं आणि किती महत्वाचं असत याचा प्रत्यय देईल. या मालिकेद्वारे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येत आहे. या पहिल्या गोष्टीत त्याला अभिनेत्री गिरीजा गोडबोले साथ देत आहे.

वाचा : अखेर दीपिकाची कंबर झाकून ‘घुमर’चे नवे व्हर्जन प्रदर्शित

श्रेयसला त्याच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘ झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, नवे पर्व…युवा सर्व असे बिरूद घेऊन आलेल्या झी युवा या नव्या वाहिनीने वर्षभरातच युवास्पंदने अचूक टिपली. मैत्रीतील जीवाभावाचे सख्य, कॉलेजमधील मोरपंखी दिवस, प्रेमात पडल्यानंतरचा नवथरपणा, हॉस्टेललाइफ अशा आजच्या तरूणाईच्या भावविश्वाचे आकाशच जणू झी युवा वाहिनीने आपल्या कवेत घेतले. त्यामुळेच झी युवाने जेव्हा मला ‘ गुलमोहर’ मालिकेतील पहिल्या गोष्टीबद्दल विचारले तेव्हा मी लगेच तयार झालो. या गोष्टीत गिरीजा गोडबोले माझ्याबरोबर असून मंदार देवस्थळीसारखे उत्तम दिग्दर्शक ही मालिका दिग्दर्शित करत आहेत.