प्रसिद्ध दिग्दर्शक गुरु दत्त आणि गायिका गीता दत्त यांचा मुलगा अरुण दत्त यांचे शनिवारी दुपारी पुण्यात निधन झाले. ५८ वर्षीय अरूण यांच्या किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे मुलगी गौरीने सांगितले.
गेले एक वर्ष ते आजारी होते. अनेक व्याधींनी ते त्रस्त होते. मात्र, त्यांच्या किडन्या निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. शनिवारी रात्रीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असे गौरी म्हणाली. गुरु दत्त फिल्म्स अॅक्टींग अकॅडमीमध्ये ते दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली- गौरी, करुणा असा परिवार आहे. या दोघी अनुराग कश्यपच्या निर्मिती संस्थेत काम करतात.

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब