गुरू काऊन डाउन सुरु… वाटेला नाय जायचं आपला विषय खोल आहे… अशी तुफान डायलॉग बाजी करणारा गुरु हा सिनेमा २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय. इरॉस इंटरनॅशनल, बॅगपायपर सोडा आणि ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हनची निर्मिती असेलला हा सिनेमा येत्या वर्षातील धमाकेदार फिल्म असेल. एंटरटेनमेंटचं कमप्लीट पॅकेज असलेला डॅशिंग गुरु प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमे देणारा आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरहिरो अंकुश चौधरी या सिनेमातून आपल्याला झकास लुकमध्ये दिसणार आहे  त्याचा हाच बेस्ट लूक आणि त्याची सिनेमातील भूमिका प्रेक्षक आणखी पसंत करतील. नुकतंच दादर येथील प्लाझा थिएटरमध्ये ‘गुरू’ सिनेमातील ‘फिल्मी फिल्मी’…हे गाणं अंकुशच्या चाहत्यांच्या उपस्थितीत एकदम गुरु स्टाईलने लाँच करण्यात आलं. या गाण्यासोबतच मँगोडॉली आणि गुरू या दोघांचा सिनेमातील लूक सांगणाऱ्या पोस्टरचं ढोल ताशांच्या गजरात अनावरणही करण्यात आलं. उर्मिला आणि अंकुश या दोघांनी या २० फुटाचं असलेल्या या पोस्टरचं क्रेनच्या मदतीने रीव्हील केलं. त्यानंतर या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आणि ‘फिल्मी फिल्मी’ हे गाणंही दाखवण्यात आला. या प्रसंगी उपस्थितीत असलेल्या चाहत्यांनी ‘फिल्मी फिल्मी’ गाण्याला वन्स मोर दिला.
संगीत दिग्दर्शक पंकज पडघन, गायक विजय प्रकाश आणि गीतकार क्षितीज पटवर्धन या त्रिकुटाची हटके क्रिएशन म्हणजे ‘फिल्मी फिल्मी’…गाणं. “रोमँटिक जॉनरचं हे गाणं प्रेक्षकांना नक्किच आवडेल अशी मी आशा करतो. हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे कारण हे गाणं पहिल्याच चालीत संजयदादा यांनी पसंत केलं. अंकुश चौधरी याला प्रेझेंट करणाऱ्या गुरु गाण्यात त्याला अतिशय तडक फडक, डॅशिंग दाखवण्यात आलं आहे, तर त्या विरुद्ध फिल्मी फिल्मी गाण्यात रोमँटिक गुरूला सादर करण्यात आलं आहे.” असं पंकज पडघन यांनी यावेळी सांगितले.
संगीताशी जोडलेल्या सात प्रकारच्या वाद्यांचा केलेला वापर, अगदी फिल्मी स्टाईलने केलेला अंकुश आणि उर्मिला यांचा वावर, या गाण्याची केलेली सुंदर कोरिओग्राफी, या सर्व वैशिष्ट्यांमुळे हे गाणं खूपच खुलून दिसतंय. उमेश जाधवने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.