05 March 2021

News Flash

गायक गुरु रंधावाच्या नावे झाला ‘हा’ अनोखा विक्रम

गुरुने 'हाय रेटेड गबरू', 'लाहोर', 'बन जा तू मेरी राणी', 'सूट सूट' अशी गाणी गायली आहेत

गुरु रंधावा

लोकप्रिय हिंदी-पंजाबी गायक गुरु रंधावा याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. टी-सीरिजसाठी गाणारा रंधावा हा यूट्यूबवर सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला भारतीय गायक ठरला आहे. गुरुच्या सर्व व्हिडीओला ३०० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गुरुने त्याचे प्रतिस्पर्धी असणारा रॅप गायक हनी सिंग आणि बादशाहलाही मागे टाकले आहे. या यशानंतर गुरुने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गुरुने ‘हाय रेटेड गबरू’, ‘लाहोर’, ‘बन जा तू मेरी राणी’, ‘सूट सूट कर दा’ अशी गाणी गायली आहेत. या विक्रमानंतर बोलताना गुरुने चाहत्यांनी दिलेल्या प्रेमासाठी त्यांचे आभार मानले आहेत. मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी सर्व चाहत्यांचे आभार. मला वाटतं भारतामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही गायकाला यूट्यूबवर ३०० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मला या क्षणी खूप आनंद होत आहे. जगभरामधील ज्या चाहत्यांनी माझी गाणी आवडीने पाहिले त्यांचे मी आभार मानतो अशा शब्दात गुरुने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गुरुच्या या टी-सीरिजबरोबरच्या प्रवासात त्याला कंपनीचे अध्यक्ष भूषण कुमार यांचा मोठा हातभार लागला. त्यांच्यामुळेच गुरुला पहिल्यांदा २०१५ मध्ये ‘पटोला’ हे गाणे गाण्याची संधी मिळाली आणि तो पहिल्यांदा टी-सीरिजसाठी गायला. गुरुच्या या प्रवासात मागील तीन वर्षांपासून त्याच्या पाठिशी असणाऱ्या भूषण यांनी आनंद व्यक्त केला. मला गुरुचा अभिमान आहे. टी-सीरिज कंपनीच्या कलाकाराने असे यश मिळवणे आमच्यासाठीही खास आहे. गुरुचा प्रवास पाहिल्यानंतर अशा कलाकारांना संधी देण्याचा माझा विश्वास वाढला असल्याचेही भूषण यांनी सांगितले.

गुरुची पंजाबी टच असणारी हिंदी गाणी तरुणाईमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. गुरुचा सोशल मिडियावरील वावरही या यशामागील कारण आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. फेसबुकवर त्याच्या पेजला ३५ लाख ४८ हजारहून अधिक लाईक्स, ट्विटरवर १ लाख ९७ हजारहून अधिक फॉलोअर्स असून इन्स्ताग्रामवर त्याचे ५० लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 5:46 pm

Web Title: guru randhawa becomes most viewed indian singer on youtube
Next Stories
1 काजोलने नाकारलेली शाहरुखच्या बहिणीची भूमिका
2 ट्विंकल खन्नाचे हे ट्विट भीमा-कोरेगावप्रकरणी झालेल्या अटकसत्राबद्दल?
3 सनी लिओनी पुन्हा ठरली ‘नंबर वन’
Just Now!
X