02 March 2021

News Flash

गुरु रंधावाने केला साखरपुडा? फोटोतील ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

"नवीन वर्ष, नवीन सुरूवात" अशा आशयाचं कॅप्शन गुरूने त्या फोटोला दिलं आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक कलाकारांनी नवीन सुरुवातीची, लग्नाची किंवा साखरपुड्याची आनंदाची बातमी देत आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या लग्नानंतर आता लोकप्रिय हिंदी -पंजाबी गायक गुरु रंधावाने देखील साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे. गुरू रंधावाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल्यानंतर या सगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे.

गुरू रंधावाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गुरू एका मुलीचा हात पकडून मोकळेपणाने हसत असल्याचं दिसून येत आहे. पण या फोटोमध्ये त्या मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. फक्त फोटो नाही तर गुरूने दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. “नवीन वर्ष, नवीन सुरूवात” अशा आशयाचं कॅप्शन गुरूने त्या फोटोला दिलं आहे. त्यामुळे तो त्या मुलीसोबत लग्नबंधनात अडकणार की काय असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. अनेकांनी त्याला शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. मात्र ही मिस्ट्री गर्ल कोण आहे आणि त्याने खरंच साखरपुडा केलाय का यावर गुरूने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

आणखी वाचा : “..म्हणून मी बोल्ड सीन करणार नाही”; गौहर खानने केलं स्पष्ट

नवीन वर्षाच्या सुरूवातीला गुरूने हा फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या आधी गुरू रंधावा आणि नोरा फतेही यांचे ‘नाच मेरी राणी’ हे गाणे प्रदर्शित झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 3:38 pm

Web Title: guru randhawa shared a photo with a mystery girl fans think they are engaged dcp 98
Next Stories
1 ‘मला स्त्रियांचा मेंदू नाही शरीर आवडतं’; राम गोपाल वर्मांचं वादग्रस्त वक्तव्य
2 वयाच्या ४२व्या वर्षी ‘कसौटी जिंदगी की’मधील अभिनेता अडकणार लग्न बंधनात?
3 पहिल्यांदाच शोमध्ये बंद झाला एक्सपर्टचा आवाज, अमिताभ बच्चन यांनी लढवली अनोखी शक्कल
Just Now!
X