28 May 2020

News Flash

गुरू ठाकूर नव्या ‘गणवेशा’त

‘गुरू ठाकूर’ हे नाव उच्चारले की गुरूने लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची

| May 5, 2015 06:22 am

‘गुरू ठाकूर’ हे नाव उच्चारले की गुरूने लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात. प्रामुख्याने ‘गीतकार’ अशी ओळख असलेला गुरू आता लवकरच प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना नव्या ‘गणवेशा’त भेटणार आहे. आगामी ‘गणवेश’ या मराठी चित्रपटात गुरू अभिनय करणार असून या चित्रपटात तो वीटभट्टीवरील मुकादमाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीला रंगमंचावर अभिनय करणाऱ्या गुरूने एका एकांकिकेसाठी गाणे हवे म्हणून ते लिहिले आणि पुढे कवी-गीतकार अशीच त्याची ओळख झाली. मराठी चित्रपट, मालिका क्षेत्रात त्याने आपल्या गाण्यांनी स्वतंत्र ठसा उमटविला, वेगळी ओळख निर्माण केली. ‘नटरंग’ या चित्रपटात त्याचा अभिनय पाहायला मिळाला होता. पण, आता ‘गणवेश’च्या निमित्ताने त्याच्यातील अभिनेत्याचे दर्शन पुन्हा घडणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक व छायालेखनकार अतुल जगदाळे यांच्यामुळे गुरू या चित्रपटात वीटभट्टीवरील मुकादमाच्या भूमिकेत दिसणार आहे. सामाजिक विषयावरील या चित्रपटात किशोर कदम, स्मिता तांबे, दिलीप प्रभावळकर हे कलाकार आहेत. गीतकार गुरू आता पुन्हा एकदा अभिनय करणार असून प्रेक्षकांना व गुरूच्या चाहत्यांनाही गुरूच्या नव्या भूमिकेची उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2015 6:22 am

Web Title: guru thakur acting in ganvesh movie
टॅग Marathi Movie
Next Stories
1 अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात मराठी नाटय़, संगीत, कला महोत्सवाची मेजवानी
2 ‘द ब्लॅक शीप’ची गुंज ‘कान’ महोत्सवात
3 पुढच्या जन्मी पत्रकार होण्याची बिग बींची इच्छा
Just Now!
X