News Flash

‘होय, मी अलिबागवरून आलोय’

आली रे आली आता अलिबागकरांची बारी आली.

अलिबागचा पहिला मराठी चित्रपट "गुलमोहोर".

अलिबाग से आया क्या..  हे अगदी सहज समोरच्या व्यक्तीतील गुणांचा विचार न करता त्याची खिल्ली उडवत त्याचं मनोधैर्य खच्ची करण्याचं सर्वांच्या तोंडी बसलेलं वाक्य.  या वाक्या मागे काय इतिहास आहे??.. इतिहास हाच की अलिबागची माणसं म्हणजे साधी, सरळ, कोणालाही न फसवणारी.. म्हणून ते टवाळखोरांच्या मते मूर्ख ठरले.. आणि कादर खान सारख्या चटपटीत संवाद लेखक/ अभिनेत्याने हे वाक्य चित्रपटात वापरल्यानंतर तर जणू काही टवाळखोरांचे ब्रीद बनले. याच उपहासाला वैतागून अलिबागचा युवक बाहेरच्या जगात त्याचा आत्मविश्वास गमावू लागला. पण आता वेळ बदलली आहे. आली रे आली आता अलिबागकरांची बारी आली. ज्या चित्रपटांच्या माध्यमातून अलिबागची खिल्ली उडवली त्यांना त्याच चित्रपटाच्या माध्यमातून आता अलिबागकर गर्वाने उत्तर देणार.. ‘होय, मी अलिबागवूर आलोय.’

अलिबागकर जगात कुठेच कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. हा वारसा चालत आलाय दर्यावर्दी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यापासून. स्वतंत्र भारताचा अभिमान जनरल अरुण कुमार वैद्य ते जय मल्हार मालिकेतील स्वतः खंडोबाची भूमिका करणारे देवदत्त नागे यांच्या पर्यंत. आणि हाच सोनेरी वारसा आपण पुढे चालवला जातोय एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून. होय, अलिबागचा पहिला मराठी चित्रपट “गुलमोहोर”. आणि हे आहे या चित्रपटातील प्रमोशनल गाणं असणार आहे.

हा चित्रपट प्रसिद्ध लेखक, गीतकार, अभिनेते, निर्माते श्रीरंग गोडबोले (झी वाहिनी निर्माते) यांनी पाहिला व अलिबाग मधील टॅलेंट पाहून ते थक्क झाले. त्यांनी अलिबागची धमक ओळखली आणि ठामपणे या चित्रपटाच्या मागे त्यांचा स्वतः चा सिनेमा असल्यासारखे उभे राहिले. या गीताचे गीतकार आहेत स्वतः श्रीरंग गोडबोले. हेच अलिबागचे यश आहे.. अलिबागच्या मातीचा अभिमान जागवणारे आणि मना मनात अलिबागचा गर्व द्विगुणित करणारे गीत ‘हा मैं अलिबागसे आया..’ तसेच, या चित्रपटातून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेता भूषण प्रधान हे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 9:52 am

Web Title: haa main alibaug se aya song from upcoming marathi movie gulmohar
Next Stories
1 Yuvraj and Hazel Keech Wedding: युवी-हेजलच्या लग्नात निमंत्रितांच्या यादीतून वगळले हे नाव..
2 मराठी चित्रपटाच्या संगीताला बॉलीवूडचा साज
3 Yuvraj and Hazel Keech Wedding: युवराजसाठी ‘ये इश्क नही था आसां…’
Just Now!
X