‘बेबी बेबी’ या गाण्यामुळे सुपरस्टार झालेला जस्टिन बीबर पाश्चात्य संगीताच्या दुनियेतील एक तळपणारा तारा आहे. परंतु जस्टिन सुरेल आवाजासोबतच त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्समुळेही चर्चेत असतो. आजवर सेलिना गोमेज, टेलर स्विफ्ट, सोफी रिचेल, केंडल जेनर, मिरांडा केर यांसारख्या अनेक तरुणींसोबत जस्टिनचं नाव जोडलं गेलं आहे. दोन वर्षांपूर्वी जस्टिननं हॅली रोडसोबत लग्न केलं. परंतु त्याची रंगेल जीवनशैली आजही त्याचा पाठलाग सोडत नाही. एक्स गर्लफ्रेंड्सची नाव ऐकून हॅलीचं डोक फिरतं असा खुलासा स्वत: जस्टिनने केला आहे.
सर्वाधिक वाचकपसंती – “लग्न केलं ही बातमी आई-बाबांना सांगायला विसरलो”; अभिनेत्याने सांगितला तो किस्सा
लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या जस्टिनने आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. यादरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगितले. तसेच आपल्या एक्स गर्लफ्रेंड्सचाही उल्लेख केला. तो म्हणाला,
“माझं नाव आजवर अनेक तरुणींसोबत जोडलं गेलं आहे. लहानपणापासून सुरु झालेली ही यादी संपणार नाही इतकी नावं त्यामध्ये आहेत. काही नावं खरी देखील आहेत. हॅलीला माझ्या भूतकाळाचा फार त्रास होतो. अनेकदा तिला लोक तिला चिडवतात. माझे जुने फोटो तिला सोशल मीडियावर टॅग करतात. परंतु ती शांतपणे हे सर्व सहन करते. कदाचित तिला राग येत असावा परंतु माझ्या प्रेमापोटी ती शांत राहते.”
जस्टिनच्या या वक्तव्यावर हॅली म्हणाली, “सुरुवातील मला राग यायचा. परंतु आता मला त्याची सवय झाली आहे. माझा पती सुपरस्टार आहे. शिवाय तो हँडसम देखील आहे. त्यामुळे जगभरातील लाखो तरुणी त्याच्यावर प्रेम करतात. कधीकाळी मी देखील त्यांच्यापैकी एक होती. परंतु आता मी त्याची पत्नी आहे. सुपरस्टारची पत्नी असण्याचे जसे फायदे असतात तसे नाही तोटे देखील असतात.” हॅलीच्या या प्रतिक्रियेवर जस्टिन हसू लागला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 4:18 pm