16 December 2017

News Flash

रेहा चक्रबर्तीचा हे बोल्ड लूक पाहिले का?

इन्स्टाग्रामवर ती सतत नवनवीन फोटो टाकते

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:18 PM

अभिनेत्री रेहा चक्रबर्ती

बॉलिवूड अभिनेत्री रेहा चक्रबर्तीच्या आतापर्यंतच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी ती सोशल मीडियावर सध्या चांगलीच प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर ती सतत तिचे नवनवीन फोटो टाकत असते. रेहाने २०१२ मध्ये ‘तुनीगा तुनीगा’ या तेलगु सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. २०१३ मध्ये आलेल्या ‘मेरे डॅड की मारुती’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या ती तिचे बोल्ड आणि ब्युटिफुल फोटो इन्स्टाग्रामवर टाकून सगळ्यांचेच लक्ष आपल्याकडे वेधत आहे. रेहाचे लवकरच दोन हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. रितेश देशमुखसोबत ‘बँक चोर’ आणि अर्जुन कपूर, श्रद्धा कपूरसोबतचा ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ हे दोन सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

#cutenomore #nuffsaid #rheality @gauravsawn @theanisha @amitthakur26 @shaanmu 💗

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

First Published on February 17, 2017 5:34 pm

Web Title: half girlfriends rhea chakraborty is setting instagram on fire see pics here