06 August 2020

News Flash

‘गोवा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘हाफ तिकीट’

गोवा फिल्म फेस्टिव्हल आजपासून (३ जून) सुरु होत आहे.

गोवा फिल्म फेस्टिव्हल आजपासून (३ जून) सुरु होत आहे. या फेस्टिव्हलचे वेध आता फेस्टिव्हलप्रेमीना लागले आहेत. यामध्ये विविध मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे. याचबरोबरीने प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या हाफ तिकीट चित्रपटाच्या पोस्टर व ट्रेलरची झलक गोवा फिल्म फेस्टिव्हलच्या शुभारंभाला पहायला मिळणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते हाफ तिकीट चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात येणार असून यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड, निर्माते नानूभाई जयसिंघानी, कलाकार प्रियांका बोस बालकलाकार शुभम मोरे व विनायक पोतदार उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता हा छोटेखानी कार्यक्रम रंगणार असून त्यानंतर निवड झालेल्या चित्रपटांचे स्क्रीनिंग होईल.
दिग्दर्शक समित कक्कड हाफ तिकीट च्या माध्यमातून लहान मुलांची अनोखी कहाणी मांडणार आहेत. शुभम मोरे व विनायक पोतदार यांच्यासह भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, प्रियांका बोस, कैलाश वाघमारे या कलाकारांच्या भूमिका आहेत. १५ जुलैला हाफ तिकीट आपल्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 12:11 pm

Web Title: half ticket movie in goa film festival
Next Stories
1 हॅप्पी बर्थडेः साध्या पद्धतीने रिंकूचा वाढदिवस साजरा करणार- महादेव राजगुरु
2 शिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्राची प्रतिक्रिया
3 रिव्ह्यूः लालबागची राणी
Just Now!
X