25 February 2021

News Flash

“यांना खरंच नेता म्हणायचं का?”; दिग्दर्शकाने साधला राजस्थानमधील घडामोडींवर निशाणा

राजस्थानमधील राजकारणावर बॉलिवूड दिग्दर्शक संतापला

काँग्रेसचे निवडून आलेले १०७ आमदार आहेत. त्याशिवाय १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे. भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आणि आरएलडीच्या एका आमदाराचा गेहलोत सरकारला पाठिंबा आहे. म्हणजे १२२ ते १२३ आमदार गेहलोत यांच्यासोबत आहेत.

राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी बंडाचा झेंडा हाती घेतला. रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. राजस्थानमधील या राजकीय घडामोडिंवर बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात करोनाचं संकट असताना यांना राजकारण सुचतंय असा टोला त्यांनी लगावला आहे.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकीला दिग्दर्शकाने सुनावले खडेबोल

अवश्य पाहा – ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्या रायसोबत काम केलेल्या अभिनेत्याचं निधन

काय म्हणाले हंसल मेहता?

“देशात महामारीचं संकट आहे. देश आर्थिक संकटात अडकला आहे. सैन्य देखील दररोज शत्रुशी दोन हात करत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत या मंडळींना राजकारण सुचतय? ही मंडळी देशातील परिस्थितीवर लक्ष देणार आहेत की नाही? खरंच हे नेता आहेत का? खरंच यांना जनतेची सेवा करायची आहे का?” अशा आशयाचे ट्विट करुन हंसल मेहता यांनी देशातील राजकारणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याने त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात संताप व्यक्त करत रविवारी काही समर्थक आमदारांसह दिल्ली गाठली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खंदे समर्थक आणि संघटनात्मक महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत आणि पायलट यांच्या विकोपाला गेलेल्या सत्तासंघर्षांचा अहवाल राहुल यांना दिला. त्यात पायलट यांना पाठवलेल्या नोटिसीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी पायलट यांनी रविवारी दिल्लीत ठाण मांडले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:33 pm

Web Title: hansal mehta comment on rajasthan politcal crisis mppg 94
Next Stories
1 करण जोहरने ट्रोलिंगला कंटाळून सोशल मीडियावर बनवले नवे प्रायव्हेट अकाऊंट?
2 …म्हणून फोटोग्राफर्सवर संतापला अक्षय कुमार; व्हिडीओ होतोय व्हायरल
3 मौनी रॉयने ऐश्वर्याच्या स्टाईलमध्ये केला डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X