29 October 2020

News Flash

‘करोना’से लागे ना डर; मालदीवमध्ये हंसिका घेतेय सुट्टीचा आनंद

सध्या सगळीकडेच चिंतेचं वातावरण पसरलं आहे

जगभरामध्ये करोना विषाणूने थैमान घातलं आहे. अनेक देश या विषाणूमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच चिंतेचं वातावरण पसरलं आहे. भारतातही या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे सरकार नागरिकांना शक्यतो घरी राहण्याचं आवाहन करत आहे. परंतु अशा परिस्थितीतही अभिनेत्री हंसिका मोटवानी मात्र मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असल्याचं समोर आलं आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचा एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे. हंसिका सोशल मीडियाच्या माध्यमातून या चाहत्यांच्या संपर्कात राहात असते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हंसिका बऱ्याच वेळा फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्येच काही दिवसापूर्वी तिने मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या या परिस्थितीमध्ये हंसिका मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Salt,sand,sea #islandlife

A post shared by Hansika Motwani (@ihansika) on

हंसिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मालदीवमध्ये चीलआऊट करताना दिसत आहे. तिने बरेचसे फोटो शेअर केले असून  त्याला साजेसे कॅप्शनही दिले आहेत. यात “स्वत:च्या उज्ज्वल भविष्याकडे पाहताना”, असं कॅप्शन तिने एका फोटोला दिलं आहे.

दरम्यान, हंसिका दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून बॉलिवूडमध्येही तिचा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. छोट्या पडद्यावरील ‘सोनपरी’ या मालिकेमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 11:05 am

Web Title: hansika motwani maldives vacation beach photos viral on social media ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : खरे हिरो! नचिकेत बर्वेच्या आईवडिलांचा आदर्श घ्या
2 ‘मी टू’ आरोपांचा दोषी असलेल्या निर्मात्याला करोनाची लागण
3 करोनामुळे लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांचा मृत्यू
Just Now!
X