28 October 2020

News Flash

अभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव

संजय चौधरीची दिवसाढवळ्या फसवणूक

‘हप्पू की उलटन पलटन’ फेम अभिनेता संजय चौधरीसोबत एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. मालिकेच्या चित्रीकरणासाठी जात असताना एका अज्ञात इसमाने त्याची लूट केली आहे. पोलिसांची धमकी देत या इसमाने त्याच्या जवळील पैसे लंपास केला आहे. संजयने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मीरा रोडवरुन नायगाव येथे हप्पू की उलटन पलटन या मालिकेच्या सेटवर जात असताना दिवसाढवळ्या एका इसमाने संजयची लूट केली . दुपारी २.३० वाजता त्या व्यक्तीने संजयला शिवीगाळ करत त्याच्या जवळील पैसे लंपास केले आहेत.

“मी दुपारी २.३० च्या दरम्यान मीरा रोड येथून नायगावला मालिकेच्या सेटवर निघालो होतो. त्यावेळी एक व्यक्ती बाईकवर आला आणि जोरजोरात माझ्या गाडीची काच वाजवू लागला.सोबतच तो अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करत होतो. त्याने मला गाडी बाजूला घेण्यास सांगितली. त्यावेळी माझ्या गाडीमुळे त्या इसमाला स्पर्शदेखील झाला नाहीये तरी हा असं का सांगतो याचा विचार मी करत होतो”, असं संजय म्हणाला.

 

View this post on Instagram

 

This is actually happened with me criminals doesn’t care who you are

A post shared by Sanjay choudhary (@sanjayychoudhary) on

पुढे तो म्हणाला, “गाडी बाजूला घेतल्यानंतर या इसमाने मला गाडीची काच खाली घ्यायला सांगितली. त्यावर मी काच खाली केली तर या इसमाने खिडकीतून हात आतमध्ये टाकत गाडीचा दरवाजा उघडला आणि तो गाडीत येऊन बसला. त्यानंतर त्याने माझा फोन घेतला आणि तू मला मारलंस. माझं खूप नुकसान झालं आहे, असा खोटा आरोप माझ्यावर केला. त्याचवेळी त्याला साथ द्यायला आणखी २-४ जण तिथे आले आणि आताच्या आता मला एटीएममधून २० हजार रुपये काढून दे असं त्यांनी मला सांगितलं. त्याच वेळी माझ्या एटीएममध्ये पैसे नाहीत असं मी सांगितल्यावर त्यांनी मला पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी माझ्या पाकिटात जितके पैसे होते ते सगळे काढून घेतले आणि माझा फोन परत करत निघून गेले”.

दरम्यान, या घटनेनंतर संजय पोलीस तक्रार करण्यासाठी मीरारोड पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. मात्र हा विभाग वसई पोलीस ठाण्याअंतर्गत येतो त्यामुळे तेथे तक्रार दाखल करावी लागेल असं मीरारोड पोलिसांनी त्याला सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 11:41 am

Web Title: happu ki ultan paltan fame sanjay choudhary looted and threatened at mira road ssj 93
Next Stories
1 “ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग”; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया
2 ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ
3 Happy Birthday Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहित आहे का?
Just Now!
X