News Flash

Aww.. So Cute! विराटने पोस्ट केला अनुष्कासोबतचा रोमँटिक फोटो

विरुष्काच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण

(संग्रहित)

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ही ‘हॉट अँड फिट’ जोडी कायम चर्चेत असते. विराट कोहली ज्यावेळी मैदानावर फटकेबाजी करत असतो, तेव्हा बहुतेक वेळी अनुष्का स्टेडिअममध्ये असते. आपल्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी ती कायम सज्ज असते. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे ११ डिसेंबर २०१७ ला विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या लग्नाला आज दोन वर्षे झाली. त्यानिमित्त विराटने एक रोमँटिक फोटो पोस्ट करत अनुष्काला शुभेच्छा दिल्या.

IPL 2020 : मुंबई इंडियन्स लावू शकतं विराटवर बोली

‘विरूष्का’चा स्वप्नवत विवाहसोहळा इटलीत पार पडला होता. आजही प्रत्येक चाहत्याला तो विवाहसोहळा आठवणीत आहे. या विवाहाच्या शुभेच्छा देताना विराटने एक सुंदर असा फोटो पोस्ट केला आहे. त्यात विराट अनुष्काच्या कपाळाचे चुंबन घेत आहे आणि अनुष्का त्याच्याकडे प्रेमाने बघत आहे. त्या फोटोखाली विराटने रोमँटिक कॅप्शनदेखील लिहिली आहे. “केवळ प्रेम हे खरं असतं, इतर काहीही सत्य नसतं. त्यातच जेव्हा देवाच्या कृपेने प्रेम करणारा साथीदार आपल्याला लाभतो तेव्हा देवाचे आपण खुपच ऋणी असल्यासारखे वाटते.

अनुष्कानेही विराटसोबतचा लग्नातील फोटो शेअर केला आहे.

विराट आणि अनुष्का यांचे लग्न इटलीतील टस्कनी या शांत आणि निसर्गरम्य गावात झाले. या लग्नात अनुष्का शर्माचे कौटुंबिक गुरू अनंत महाराज आणि विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना विशेष निमंत्रण होते. विराटचे लहानपणीचे काही मित्रही या लग्नाला आवर्जून उपस्थित होते. तसेच या लग्नाला विराटची आई, मोठा भाऊ-वहिनी आणि पुतण्या, तर अनुष्काचे आई-बाबा आणि भाऊ उपस्थित होते. लग्नासाठी सुमारे एक कंटेनर भरून फुलं मागवण्यात आली होती. त्या फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. मेहंदीपासून ते हळदी समारंभापर्यंत बऱ्याच गोष्टींचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले. लग्नानंतर २१ तारखेला दिल्लीमध्ये, तर २६ तारखेला मुंबईत नातेवाईक, क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील इतर मान्यवरांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. त्यांच्या लग्नाला यंदाच्या वर्षी दोन वर्षे पूर्ण झाली. विराट-अनुष्काची जोडी ‘विरूष्का’ म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

विराटसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

भारतीय संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विंडीजने दमदार पुनरागमन केले. सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आज मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. हा सामना गमावला तर भारताला मालिका गमावण्याचा धोका आहे. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:36 pm

Web Title: happy anniversary virushka virat kohli anushka sharma kiss on forehead romantic photo vjb 91
Next Stories
1 आजारपणामुळे सलमान सोडतोय ‘बिग बॉस १३’?
2 #CAB : तुम्ही तुमची काळजी करा; अदनान सामीने पाकिस्तानला झापलं
3 अ‍ॅक्शनपट क्रेझ हृतिकची, पसंती टायगर-विद्युतला!
Just Now!
X