News Flash

#HappyBirthdayAamirKhan : वडिलांच्या निर्णयाविरुद्ध बॉलिवूडमध्ये आला अन् ‘परफेक्शनिस्ट’ म्हणून प्रसिद्ध झाला

वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

#HappyBirthdayAamirKhan : वडिलांच्या निर्णयाविरुद्ध बॉलिवूडमध्ये आला अन् ‘परफेक्शनिस्ट’ म्हणून प्रसिद्ध झाला
आमिर खान

‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील ‘पापा कहते है बडा नाम करेगा….’ गाण्याने मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने एका वेगळ्या अंदाजात तरुणाईवर छाप सोडली होती. त्याचे हे गाणे आजही चांगलेच लोकप्रिय आहे. बॉलीवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आज आमिरचे नाव घेतले जाते. फक्त बॉलिवूडच नाही तर चीनमध्येही तो लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला गेला. आमिरचे चित्रपट भारतापेक्षा चीनमध्ये सर्वाधिक कमाई करतात. चित्रपट निवडतानाही आमिर चांगलाच सजग असतो. प्रत्येक चित्रपटातील भूमिकेच्या गरजेप्रमाणे तो स्वतःतही काही बदल करतो. चित्रपट हा परिपूर्णच असला पाहिजे असा त्याचा अट्टहास असतो. अशा या मिस्टर परफेक्शनिस्टनं वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

आमिरचे वडिल ताहिर हुसैन यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत चांगले नाव होते. बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या ताहिर यांना आमिरने बॉलिवूडमध्ये यावे, असे कधीच वाटत नव्हते. पण, वडिलांच्या विरोधात जाऊन आमिरने बॉलिवूडचे व्यासपीठ निवडले. आमिर खानने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी थिएटरपासून सुरुवात केली होती. आताच्या घडीला त्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली असली तरी त्याने सुरुवातीला थिएटरमध्ये बॅकस्टेजवर तब्बल दोन वर्षे कामंही केलं होतं.

आमिर खानने पहिल्यांदा ‘होली’ या फिचर चित्रपटामध्ये काम केले होते. त्याचा हा चित्रपट ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया”मध्ये शिक्षण घेतलेल्या दिग्दर्शक केतन मेहता यांचा तो चित्रपट होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘होली’मध्ये आमिरसोबत आशितोष गोवरीकर, ओम पुरी, नसिरुद्दीन शहा, परेश रावल या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. आमिरने १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 11:18 am

Web Title: happy birthday aamir khan his journey in bollywood
Next Stories
1 ‘केजीएफ: चॅप्टर टू’चे शुटिंग सुरू
2 ‘कलंक’ ठरला २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेलेला टीझर
3 ‘कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता’
Just Now!
X