मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता असलेला अंकुश चौधरी आज त्याचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अंकुशने मराठीतील “सुना येती घरा” ह्या चित्रपटातून पदार्पण केले, मग पुढे त्याने मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटात सुद्धा अभिनय केला. “जिस देश मे गंगा रेहेता है” हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट. २०१३ मध्ये “दुनियादारी” ह्या चित्रपत त्याने साकारलेल्या डी-एस-पी च्या धडाकेबाज भूमिकेकरता त्याला उत्कृष्ट सहकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला.
१९८९ -९० या सुमारास ‘महाराष्ट्राची लोकधारा’ पासून अंकुशने त्याचा प्रवास सुरू केला. त्यानंतर अनेक महाविद्यालयीन एकांकिका, ऑल द बेस्ट’ नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर त्याने पदार्पण केले. केदार शिंदेबरोबरच्या ‘हसा चकट फू’ या कार्यक्रमातून मग त्याने छोट्या पडद्यावर प्रवेश केला. नंतर ‘आभाळमाया’ आणि हर्षदा खानविलकर बरोबर ‘बेधुंद मनाच्या लहरी’ सारख्या सुप्रसिद्ध मालिकाही त्याने केल्या. छोट्या पडद्यावर काम करत असतानाच मोठ्या पडद्यावर झळकण्याचे त्याचे स्वप्न ‘सुना येती घरा’ या चित्रपटामुळे पूर्ण झाले. ‘मातीच्या चुली’, ‘आई शप्पथ’, ‘जत्रा’, ‘यांचा काही नेम नाही’, ‘यंदा कर्तव्य आहे’, माझा नवरा तुझी बायको’, ‘इश्श’, चेकमेट’, ‘उलाढाल’, ‘रिंगा रिंगा’, ‘लालबाग परळ’, आणि अगदी अलिकडचा ‘प्रतिबिंब’ असे अत्यंत मोजके पण हिट चित्रपट अंकुशच्या नावावर आहेत. तो एक अभिनेताच नाही तर दिग्दर्शकही आहे. केदारबरोबर त्याने ‘अगंबाई अरेच्चा’ आणि ‘जत्रा’ या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. ‘साडे माडे तीन’ चित्रपटाव्दारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

(छाया सौजन्यः अंकुश चौधरी फेसबुक पेज)