News Flash

अक्सा बीचवर पुन्हा त्यांची भेट झाली अन्…; शाहरुख-गौरीची हटके लव्हस्टोरी

गौरी-शाहरुखचं भांडण झालं, अन्...

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली आणि आदर्श जोडी म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांच्याकडे पाहिलं जातं. १९९१ साली या दोघांनी लग्न केलं. तेव्हापासून आजतागायत या दोघांनी एकमेकांची कायम साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्यामधील प्रेमाची चर्चा कायमच चाहत्यांमध्ये रंगत असते. यामध्ये ‘किंग ऑफ रोमॅन्स’ म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुखची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. विशेष म्हणजे या दोघांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाइतकीच रंजक आहे.
शाहरुख-गौरीची पहिली भेट

दिल्लीत राहणाऱ्या शाहरुखने गौरीला १९८४ मध्ये एका पार्टीमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा आणि गौरी १४ वर्षांची होती. त्यानंतर अनेकदा त्याने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर अखेर त्याने तिचा फोन नंबर मिळवला आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्री वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला फार काळ लागला नाही.

…जेव्हा गौरीने केला होता ब्रेकअप

शाहरुख खान सुरुवातीला गौरीसाठी खूप पझेसिव्ह होता. तिने दुसऱ्या मुलांशी बोलणं, केस मोकळे सोडणं त्याला आवडायचं नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तो गौरीशी भांडू लागला. यामुळे त्रस्त झालेल्या गौरीने त्याच्याशी अबोला धरला आणि काही दिवसांसाठी मैत्रिणींसोबत ती दिल्लीहून मुंबईला आली. शाहरुखला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा गौरीसाठी तोसुद्धा मुंबईला आला. मुंबईतल्या अक्सा बीचवर पुन्हा एकदा या दोघांची भेट झाली आणि एकमेकांना पाहताचक्षणी दोघांनाही रडू कोसळलं. त्याच वेळी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

शाहरुख आणि गौरी वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालताना शाहरुखच्या नाकीनऊ आलं होतं. अखेर त्याने गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यात यश मिळवलं. २५ ऑक्टोबर १९९१ रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. २६ ऑगस्ट १९९१ रोजी त्यांचं कोर्टात लग्न झालं. दोघांचा निकाहसुद्धा झाला. यावेळी गौरीचं नाव आयशा ठेवण्यात आलं होतं.

१९९७ मध्ये गौरीने आर्यनला जन्म दिला आणि त्यानंतर २००० मध्ये शाहरुख- गौरीच्या आयुष्यात सुहानाचं आगमन झालं. जुलै २०१३ मध्ये सरोगसीद्वारे अबरामचा जन्म झाला. वैवाहिक आयुष्यात दोघांनी बरेच चढउतार पाहिले, मात्र त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 10:36 am

Web Title: happy birthday gauri khan read srk and gauri khan love story ssj 93
Next Stories
1 शाहरूखने सांगितली DDLJ मधील अमरिश पुरींसोबतच्या ‘त्या’ दृश्यामागील खरी गंमत
2 ‘प्राण जाए पर वचन न जाए’; पद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या मागणीवर कंगनानं दिलं उत्तर
3 ‘हाथरस प्रकरणाचा राजकारणासाठी वापर’; तनुश्री दत्ताचा संताप अनावर
Just Now!
X