News Flash

Happy Birthday: हृतिकला डान्समधून मिळालेली पहिली कमाई जाणून व्हाल थक्क

त्याचे खरे आडनाव 'नागरथ' असे आहे.

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता हृतिक रोशन आज ४२ वर्षांचा झाला आहे

जगातील सर्वात सुंदर पुरुषांमध्ये तिस-या स्थानावर असलेला बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता हृतिक रोशन आज ४२ वर्षांचा झाला आहे. वैविध्यपूर्ण भूमिका आणि माचोमॅन पर्सनॅलिटीमुळे हृतिकने अनेकांची मन जिंकले आहे.

मुंबईमध्ये १० जानेवारी १९७४ रोजी जन्मलेल्या हृतिकला अभिनयाची कला वारसा म्हणून मिळाली आहे. हृतिकचे वडिल राकेश रोशन हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता आहेत. तर त्याच्या आजोबांचे संगीत क्षेत्रात फार मोलाचे योगदान आहे. त्याने बाल कलाकार म्हणून ‘आशा’, ‘आपके दीवाने’, ‘आसपास’ आणि ‘भगवान दादा’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘भगवान दादा’ चित्रपटात बाल कलाकार असणा-या हृतिकने तेव्हा एक फायटिंग सीनही दिला होता. केवळ अभिनयासाठीच नाही तर हृतिक त्याच्या डान्ससाठीही नावाजला जातो. आजच्या घडीला डान्सच्या बाबतीत हृतिकला तोडीस तोड असा एकही बॉलीवूड अभिनेता नसल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्याच्या डान्सचे तर करोडो दिवाने आहे. हृतिकला पहिल्यांदा ‘आशा’ चित्रपटात डान्स करण्याची संधी मिळाली होती. त्यासाठी त्याला १०० रुपये इतके मानधन मिळाले होते. या चित्रपटात त्याने जितेंद्र यांच्यासोबत डान्स केला होता.

हृतिकला वाचनाची खूप आवड आहे. त्याला वेळ मिळाली की तो पुस्तकं वाचतो. तुम्हाला माहित आहे का, रोशन हे त्यांचे खरे आडनाव नाही आहे. त्याचे खरे आडनाव ‘नागरथ’ असे आहे. हृतिकला घरी प्रेमाने डुग्गू असे म्हणतात. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी हृतिकने त्याच्या वडिलांना  ‘कोयला’ आणि ‘करण अर्जुन’ चित्रपटात मदत केली होती.

दरम्यान, जगातील सर्वात सुंदर पुरुषांमध्ये हृतिक तिसऱ्या स्थानावर आहे. एका वेगळ्याच लूकमुळे बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिकच्या नावाचा Worldstopmost.com. या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या एका यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हॉलिवूड अभिनेता जॉन डेप आणि ब्रॅड पिट या कलाकारांना मागे टाकत हृतिक रोशनने यात बाजी मारली होती. लवकरच हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘काबिल’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे हृतिक एका अंध व्यक्तीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेत्री यामी गौतमसुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश रोशन निर्मित आणि संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबिल’ हा चित्रपट २६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. हृतिक आणि यामी गौतम व्यकिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता रोनित आणि रोहित रॉय खलनायकी भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 10:10 am

Web Title: happy birthday hrithik roshan turns 43
Next Stories
1 ‘ती सध्या काय करते’ची जोरात कमाई
2 मोठ्या मालकांनी घातला पोहे बनविण्याचा घाट
3 नवे चित्रपट मनाला न भिडणारे – डॉ. जब्बार पटेल
Just Now!
X