शाहरुख खानच्या ‘दिल से…’ या चित्रपटातील ‘छैय्या छैय्या’ हे गाण आज बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. हे गाणं २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. या गाण्यामुळे मलायका अरोराला रातोरात सुपरस्टार झाली. धावत्या गाडीवर उभं राहून मलायकाने या गाण्याचं सादरीकरण केलं होतं. मात्र, हे चित्रीकरण करणं वाटतं तितकं सोप्पं नव्हतं. विशेष म्हणजे चित्रीकरण झाल्यानंतर मलायकाच्या कमरेला दुखापत झाली होती.

छैय्या छैय्या या गाण्याचं चित्रीकरण सुरु असताना धावत्या ट्रेनवर उभं राहून डान्स करणं मलायकाला शक्य नव्हतं. वारंवार प्रयत्न करुनही ती सातत्याने खाली पडत होती. त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये यासाठी मलायकाच्या कमरेला दोरीने बांधण्यात आलं. विशेष म्हणजे ही दोरी इतकी घट्ट होती की त्यामुळे मलायकाच्या कमरेला दुखापत झाली.

गाण्याचं चित्रीकरण संपल्यानंतर मलायकाच्या कमरेची दोरी सोडण्यात आली. त्यावेळी तिच्या कमरेवर दोरीचे वळ उठले होते आणि त्यातून रक्त येत होते. परंतु, संपूर्ण गाणं चित्रीत होईपर्यंत मलायकाने कोणतीही तक्रार न करता हे गाणं पूर्ण केल्याचं सांगण्यात येतं.

आणखी वाचा- … म्हणून अर्जुनसोबतचं नातं जगजाहीर करण्याचं ठरवलं- मलायका अरोरा

दरम्यान, हे गाणं त्याकाळी तुफान गाजलं होतं. या गाण्यात अभिनेता शाहरुख खानने देखील स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे आजही या गाण्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर असल्याचं पाहायला मिळतं.