News Flash

Happy Birthday Preity Zinta: हे पाच अविस्मरणीय चित्रपट

३१ जानेवारी रोजी प्रीती झिंटाचा ४४ वा वाढदिवस असून या निमित्त प्रीती झिंटाच्या पाच अविस्मरणीय चित्रपटांचा घेतलेला आढावा...

संग्रहित छायाचित्र

प्रीती झिंटा… १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकले…मणिरत्नम यांच्या चित्रपटात शाहरुख खान आणि मनीषा कोइराला अशा दिग्गज कलाकारांसोबत ती झळकली.. या सिनेमानंतर प्रीतीने मागे वळून पाहिलेच नाही. क्या कहना, कल हो ना हो, लक्ष्य, वीर झारा अशा चित्रपटांमधून प्रीती झिंटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्या लग्नानंतर प्रीती झिंटा मोठ्या पडद्यावर कमी झळकते. ३१ जानेवारी रोजी प्रीती झिंटाचा ४४ वा वाढदिवस असून या निमित्त प्रीती झिंटाच्या पाच अविस्मरणीय चित्रपटांचा घेतलेला आढावा…

१. दिल से (१९९८)


ए आर रेहमानचे संगीत, शाहरुख खान, मनीषा कोयरालाचा अभिनय, मणिरत्नमचे दिग्दर्शन लाभलेला चित्रपट म्हणजे दिल से. दिग्गजांच्या उपस्थितीत प्रीती झिंटाकडे दुर्लक्ष होईल की काय, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, सहज अभिनयाने प्रीती झिंटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या चित्रपटासाठी तिला १९९९ सालचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) हा पुरस्कार मिळाला होता.

२. क्या कहना


सैफ अली खान सोबतचा ‘क्या कहना’ हा प्रीतीच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला. प्रीतीने प्रिया बक्षीची भूमिका सहज साकारली. गर्भवती झाल्यानंतर प्रियकराने दिलेला दगा आणि अशा परिस्थितीत समाजाचा तरुणीकडे पाहण्याचा दृष्टीकोन दाखवणारा हा चित्रपट होता. आपल्या आयुष्यात रमणारी तरुणी गर्भवती झाल्यावर तिच्या आयुष्यात काय बदल घडतात, हा प्रवास प्रीतीने अचूक मांडला. तिच्या अभिनयाचे पैलू या चित्रपटातून पाहायला मिळाले.

३. दिल चाहता है


क्या कहनानंतर प्रीती झिंटाचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट २००१ साली झळकला. आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना हे या चित्रपटात होते. तीन मित्रांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला होता. यात प्रीतीने शालिनीची म्हणजेच आमिर खानच्या प्रेयसीची भूमिका तिने साकारली होती. तीन अभिनेते, डिंपल कपाडिया यांच्यासारखी दिग्गज लोक समोर असतानाही प्रीतीने या चित्रपटातही स्वत:ची वेगळी छाप पाडली होती.

४. कल हो ना हो


करण जोहर दिग्दर्शित ‘कल हो ना हो’ या चित्रपटात प्रीती झिंटा प्रमुख भूमिकेत होती. यात प्रीतीने नैनाची भूमिका साकरली होती. या चित्रपटात शाहरुख, प्रीती आणि सैफ या तिघांनी प्रेक्षकांना हसवले आणि रडवले देखील होते. प्रीतीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

५. सलाम नमस्ते


प्रीती झिंटा आणि सैफ अली खान ही जोडी प्रेक्षकांना भावते, हे या चित्रपटातूनही पुन्हा एकदा सिद्ध झाले. सलाम नमस्ते या चित्रपटात प्रीती झिंटाने अंबर मल्होत्राची भूमिका साकारली होती. लिव्ह इन रिलेशनशिपवर हा चित्रपट साकारण्यात आला होता. लिव्ह इनमध्ये राहणारी अंबर ‘चुकून’ गर्भवती होती आणि यामुळे त्या जोडप्याच्या आयुष्यात काय बदल होतात, यावर हा चित्रपट होता. २००५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपटही गाजला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 5:17 pm

Web Title: happy birthday preity zinta five best movies of her careers kal ho na ho dil se
Next Stories
1 रणबीरच्या ‘अमृतभेटी’विषयी बिग बी म्हणतात..
2 कलाकाराने कलेशी प्रामाणिक राहायला हवे – सुबोध भावे
3 Video : Show Must Go On ! यामीचा आत्मविश्वास कौतुकास्पद
Just Now!
X