26 January 2021

News Flash

#HappyBirthdayRanveerSingh : रणवीर सिंगबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने एका जाहिरात कंपनीत नोकरी केली होती.

रणवीर सिंग

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंगचा आज (शुक्रवार) वाढदिवस आहे. रणवीरच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आज तो यशाच्या शिखरावर आहे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारली आहे. अवघ्या आठ वर्षांत रणवीरने चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. अशा या बॉलिवूडच्या ‘बेफिक्रे’ अभिनेत्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात..

– चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रणवीरने त्याचं नाव बदलण्याचा विचार केला होता. रणबीर कपूरशी हे नाव साधर्म्य असल्याने त्याला अनेकांनी नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

– बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करण्यापूर्वी त्याने एका प्रसिद्ध जाहिरात कंपनीत कॉपी- रायटरची नोकरीसुद्धा केली होती.

– ‘यशराज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट स्विकारण्यापूर्वी त्याने तीन इतर चित्रपट नाकारले होते.

– रणवीर हा अभिनेत्री सोनम कपूरचा चुलत भाऊ आहे.

-दमदार अभिनय आणि अफलातून डान्सरसोबतच रणवीर उत्तम रॅपरही आहे.

-‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या आधी रणवीरला विचारण्यात आलं होतं. मात्र, इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने रणवीरने हा चित्रपट नाकारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 11:27 am

Web Title: happy birthday ranveer singh some interesting facts about the actor
Next Stories
1 बेली डान्स, अरेबियन तडका आणि अल्पावधीत ‘ दिलबर’ सोशल मीडियावर हिट !
2 रायगडावर रितेशचा महाराजांच्या पुतळ्यासोबत सेल्फी, शिवप्रेमी संतापले
3 फ्लॅशबॅक : नायक नही ‘खलनायक’ हू मैं…
Just Now!
X