News Flash

Happy Birthday Sagarika Ghatge : झहीर-सागरिकाची ‘लव्ह स्टोरी’ माहितीये का?

सागरिकाच्या आजी इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आज ८ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. ‘चक दे इंडिया’तील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविणारी सागरिका काही दिवसांपूर्वी तिच्या लग्मामुळे चर्चेत होती. भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खान याच्याशी तिने लग्न केले. अतिशय शांत स्वभाव असलेला झहीर आणि त्याच्या अगदी उलट असलेली सागरिका यांची प्रेमकहाणीसुद्धा रंजक आहे.

सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. मात्र, या दोघांनीही कोणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कानोकान खबर लागू दिली नाही. काही वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, पहिल्या भेटीत हे दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या आणि अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांवेळीही सागरिका त्याला पाठिंबा देताना दिसली.

 

View this post on Instagram

 

Welcoming 2020 with the man who lights up my life – Happy new year to everyone . Thank you 2019 for all the love and learnings

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

युवराज सिंगच्या गोव्यात झालेल्या लग्नापासून जयपूरमधील रिसेप्शनमध्येही सागरिका-झहीर एकत्र दिसले. आपल्या लग्नासाठी घरच्यांची मनधरनी करण्याबद्दल एका मुलाखतीत झहीर म्हणालेला की, मी घरच्यांना सागरिकाबद्दल सांगताच त्यांनी सर्वप्रथम ‘चक दे इंडिया’ ची सीडी मागवली. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला. सागरिकाच्या आजी इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या.

सागरिकाने गेल्याच वर्षी नोंदणी पद्धतीने झहीरशी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याने आपल्या मित्रपरिवारासाठी ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवले होते. शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सागरिकाने ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याव्यतिरीक्त तिने अतुल कुलकर्णीसोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 10:56 am

Web Title: happy birthday sagarika ghatge sagrika and zaheer khan love story avb 95
Next Stories
1 नेहा पेंडसेने नवऱ्याबाबत केला ‘हा’ खुलासा
2 सारा-कार्तिकच्या अफेअरच्या चर्चांवर करीनाचं मजेशीर उत्तर
3 ‘मार लो डंडे, कर लो दमन…’; स्वानंद किरकिरेंची मनाला भिडणारी कविता
Just Now!
X